चिमठाणे (जि. धुळे) : शिंदखेडा तालुक्यात जनावरे (Animal) चोरणारी टोळी काही दिवसांपासून सक्रिय झाली आहे. गुरुवारी (ता.९) शिंदखेडा पोलिसांनी मध्य प्रदेशातील पिकअप चालकाला अटक करून आरावे (ता. शिंदखेडा) येथील शेतकऱ्यांचे चार बैल शुक्रवारी (ता.१०) परत केले. (Stolen bulls returned to farmers by Shindkheda Police Dhule news)
आरावे येथील शेतकरी भिका विठ्ठल धनगर, विनोद तुळशीराम पाटील यांच्या मालकीचे चार बैल ३ फेब्रुवारीला चोरीस गेले होते. शेतकऱ्यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेले चार बैल, पिकअप (एमएच ४८ टी १६१५) असा एकूण चार लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिकअप शिरपूर तालुका हद्दीत मिळून आली. त्यावरील चालक बबलू सलदर्या कन्नोजे (वय २७, रा. धानोरा, जि. बडवानी मध्य प्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील भाबड, उपनिरीक्षक मिलिंद पवार, सदेसिंग चव्हाण, दीपक पाटील, मयूर थोरात, मोहन सूर्यवंशी, विजय पाटील यांचा पथकात समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.