Dhule News : विनापरवानगी साठवलेले HTBT कापसाचे बियाणे जप्त

cotton seeds
cotton seedsesakal
Updated on

Dhule News : मालपूर (ता. शिंदखेडा) येथे एका शेतकऱ्याकडे बंदी असलेले एचटीबीटी कापसाचे १९ किलो बियाणे विनापरवानगी साठवून ठेवल्याचे आढळून आले.

शिंदखेडा पंचायत समितीचे कृषी अधिकारी अभय नथ्थू कोर यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पंढरीनाथ सदाशिव भोई या शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Stored without permission Seizure of HTBT cotton seeds Dhule News)

६२ हजार रुपये किमतीचे सुटे कापसाचे बियाणे आढळून आल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालय जवळील पंढरीनाथ भोई यांच्या घरात छापा टाकला. त्यात १९ किलो बियाणे जप्त करण्यात आले.

भरारी पथकातील विभागीय गुणवत्ता निरिक्षक नितेंद्र पानपाटील, धुळे जिल्हा गुणवत्ता निरिक्षक मनोज सिसोदे, पोलिस कर्मचारी प्रवीण धनगर, शुभांगी पाटील यांचा पथकात समावेश होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

cotton seeds
Jalgaon Crime News : 18 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या

पथकाने बियाणे का आणले असे विचारले असता शेतात बियाणे लागवडीसाठी आणले असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. बंदी असलेले बोगस एचटीबीटी कापसाचे सुटे बियाणे पथकास आढळून आले. १९ किलो बियाणे जप्त केले आहे.

सुमारे ६२ हजार रुपये किमतीचे सुटे कापसाचे बियाणांची किंमत आहे. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन गायकवाड तपास करीत आहे.

cotton seeds
Nashik ZP News : ठेकदारांकडे फायली आढळल्यास दाखल होणार गुन्हा : आशिमा मित्तल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.