Dhule News : संचमान्यतेत आधारची अट तूर्त शिथिल; भाजप शिक्षक आघाडीच्या मागणीला यश

Adhar Card
Adhar Card esakal
Updated on

Dhule News : आधारकार्ड असलेले व नसलेले अशा सर्वच विद्यार्थ्यांचा संचमान्यतेत समावेश करण्याबाबत राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी पत्र निर्गमित केले आहे.

त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोकाही टळला असून, राज्यभरातील शेकडो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती भाजप शिक्षक आघाडीचे नाशिक विभाग संयोजक महेश मुळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. (students condition of Aadhaar will be relaxed for now dhule news)

विद्यार्थिसंख्येनुसार शिक्षण विभागाकडून शिक्षक पदांना मान्यता देण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या शासन मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन आधार नोंदणीची मोहीम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतली. त्याअंतर्गत पहिली ते बारावीच्या शेवटच्या विद्यार्थ्यांची आधारनुसार माहिती स्टुडंट्स पोर्टलवर नोंदवायची आहे.

मात्र विविध कारणांनी राज्यात २८ लाख विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन झाले नाही. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याचे संकट निर्माण झाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Adhar Card
Dhule Deputy Mayor : वैशाली वराडेंनी स्वीकारला उपमहापौरांचा पदभार

या पार्श्वभूमीवर शाळेत प्रवेशित सर्वच विद्यार्थ्यांचा संचमान्यतेत समावेश करावा, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीने केली होती.

या मागणीच्या अनुषंगाने राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक शिक्षण संचालक यांनी आधार असलेले व नसलेले अशा सर्व विद्यार्थ्यांचा संचमान्यतेत समावेश होणार असल्याचे पत्र ७ जूनला राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचा संचमान्यतेत समावेश होणार आहे. यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोकाही टळला असल्याचे श्री. मुळे यांनी म्हटले आहे.

Adhar Card
America Khandoba Idol : अमेरिकेतही गुंजणार येळकोट येळकोट चा गजर...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.