Shasan Aplya Dari : सुनीलची सलून व्यवसायातून उभारी..! जगण्यास मिळाले बळ

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari esakal
Updated on

Shasan Aplya Dari : शासकीय योजनांच्या लाभामुळे अनेक कुटुंबांना उभारी मिळते. यात तिसगाव (ता. धुळे) येथील शेतकऱ्यास ट्रॅक्टर, तसेच आंतरजातीय विवाह केल्याने दांपत्यास प्रोत्साहन अनुदान आणि परिस्थितीशी मुकाबला करणाऱ्या सलून व्यावसायिकास आर्थिक पाठबळामुळे उभारी मिळाली आहे.

येथील एसआरपीएफच्या मैदानावर सोमवारी झालेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत अनेक कष्टकऱ्यांच्या यशोगाथा शासनाच्या पाठबळामुळे समाजासमोर आल्या आहेत. (success stories of many hardworking people came before society due to support of government dhule news)

तिसगाव (वडेल, ता. धुळे) येथील बापू दौलत भामरे यांची अडीच एकर बागायती शेती आहे. बागायती शेती करताना ते बैलजोडी व पारंपरिक अवजारांचा वापर करत होते. त्यामुळे शेतीची मशागत करण्यास त्यांना फार कष्ट उपसावे लागत होते. त्यांना या वर्षी कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टरसाठी सव्वा लाखाच्या निधीचा लाभ मिळाला.

तसेच ट्रॅक्टरला आधुनिकतेची जोड म्हणून कृषी विभागामार्फत त्यांना रोटोव्हेटर मंजूर करण्यात आला असून, यासाठी त्यांना ४२ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यामुळे आता ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करणे शेतकरी भामरे यांना सहज शक्य झाले असून, त्यांच्या शेतात मका, कापूस पिकांचे उत्पादन ते घेत असल्याची प्रतिक्रिया श्री. भामरे यांनी दिली.

योजनेचा सिद्धार्थला लाभ

शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना राबविली जाते. या योजनेचे धुळ्यातील प्रियदर्शनीनगरमधील लाभार्थी सिद्धार्थ मंगल पवार व पूजा मुरारी चव्हाण यांना या योजनेंतर्गत ५० हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari : विद्यार्थिनींना सायकल मिळाल्याने खूश! यशवंतीची पापडातून 16 लाखांवर उलाढाल...

आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यास या योजनेंतर्गत लाभ दिला जातो. या अनुदानामुळे विवाहानंतर येणाऱ्या कौटुंबिक अडचणीसाठी हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत शासनाचे आभार मानले.

कोविड काळात अर्थसहाय्य

कोविड १९ च्या काळात उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले होते. प्रधानमंत्री आत्मनिर्भर (पीएम स्वनिधी) योजनेचा लाभ मिळाल्याने त्याने आपल्या व्यवसायात पुन्हा उभारी घेतली आहे.

कोविडच्या काळात व्यवसाय सुरू करण्यासाठी पथ विक्रेता, छोटे व्यवसाय करण्यासाठी प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेंतर्गत लहान व्यवसायांना लाभ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’मुळे वाहतुकीला बसणार फटका; असे आहे वाहतूक मार्गातील बदल..

यात सुनील नारायण सैंदाणे यांना दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. त्या कर्जावर ७ टक्क्यांवरील व्याज अनुदान शासनस्तरावर देण्यात येते.

त्यांनी कर्जाची वेळेवर भरणा केल्यावर त्यांना एक हजार २०० रुपये परतावा मिळाला. कर्जाची नियमित परतफेड केली म्हणून पुन्हा स्टेट बँकेने त्यांना २० हजाराचे कर्ज दिले.

श्री. सैंदाणे यांनी ही २० हजारांची परतफेड नियमित केल्यास बँकेमार्फत ५० हजारांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यांच्या या सलून व्यवसायातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असून, योजनेचा लाभ मिळाल्याने त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari : जिल्हा परिषदेचे अधिकारी पोहचले 2 लाख लाभार्थ्यांपर्यंत! ‘शासन आपल्या दारी’ विशेष मोहीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.