Success Story : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कैलासची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

Kailas Pawara with his parents
Kailas Pawara with his parents esakal
Updated on

Success Story : ‘रख हौसला वो मंजर भी आयेगा, प्यासे के पास चल के समंदर भी आयेगा; थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आयेगा..’ या ओवी रोझवा पुनर्वसन (ता. तळोदा) या प्रकल्प बाधितांच्या वसाहतीतील कैलास पावरा यांनी कठोर मेहनतीच्या व जिद्दीच्या बळावर खऱ्या करून दाखविल्या आहेत.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात एमपीएससीच्या परीक्षेत यश संपादन करीत अवघ्या चोवीसाव्या वर्षी पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली आहे. (success story kailas pawara become psi in first attempt nandurbar news)

रोझवा पुनर्वसन वसाहतीतील रमेश पावरा व चिकीबाई पावरा हे दांपत्य राहत असून त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. त्यांना पुनर्वसनानंतर अद्यापही शेती मिळालेली नाही, त्यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ते शेतात शेतमजुरी करतात. प्रसंगी मिळेल ते काम करून मुलांना चांगले शिक्षण मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहेत.

त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून त्यांचा मुलगा कैलास यांनी यश प्राप्त केले आहे. मात्र यासाठी कैलास पावरा यांना खूप परिश्रम घ्यावे लागले असून त्यांनी आपल्या मनात ठाणून प्रतिकूल परिस्थिती समोर गुडघे न टेकता शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी गावातील जि. प. शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयात घेतले.

त्यानंतर जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत पदवीचे शिक्षण घेतले. रमेश पावरा यांच्या तिन्ही मुलांनीही आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने त्यांनी देखील आई-वडिलांसोबत मजुरी, मेहनत करून शिक्षण सुरू ठेवले. त्याचबरोबर आई-वडिलांना हातभार लावला. त्यांच्या मोठा मुलाचेही शिक्षण झाले असून सध्या तो बांधकाम व्यवसायात कुशल कारागीर आहे तर मुलीचेही पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kailas Pawara with his parents
PSI Success Story: शेतकऱ्याचा पोरगा झाला फौजदार! एका मार्काच्या हुलकावणीनंतर जिद्दीने यशाला घातली गवसणी

कैलास पावरा यांनी लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षा द्यायची अशी खूणगाठ बांधली होती. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने त्यांनी कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडीवर भर दिला. यादरम्यान त्यांना अनेक मित्रांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत केली, त्याचबरोबर सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुहास वसावे यांनी देखील त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले.

त्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परीश्रम घेऊन एमपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात बाजी मारत यशाला गवसणी घातली. या परीक्षेत साडेसहाशे जणांमध्ये कैलास पावरा हे सर्वात कमी वयाचे होते हे देखील विशेष. कैलास यांनी कठीण काळातही शिक्षण व अभ्यासाची गोडी कमी होऊ दिली नाही व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपले ध्येय गाठले. त्यांनी मैदानी चाचणीत शंभर पैकी ९३ गुण घेऊन आपले वर्चस्व सिद्ध केले.

"माझे आई-वडील, गुरुजन, मित्रमंडळी सर्वांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिले त्यासाठी त्यांचा कायम ऋणी राहील. तसेच, माझ्या कार्यकर्तृत्वातून सामान्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील राहील. गाव व परिसरातील तरुण, तरुणी अधिकारी व्हावेत यासाठी नेहमीच माझे सहकार्य राहील." - कैलास पावरा.

Kailas Pawara with his parents
PSI Success: तब्बल 21 वेळा स्पर्धा परीक्षा देऊनही मानली नाही हार! इंजिनिअर शेतकरी सत्वपरिक्षा देऊन झाला फौजदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.