Nandurbar Suhas Naik : नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. छायात्रिात जरी भेटीचा एकच प्रसंग असला तरी यातून चर्चा मात्र अनेक होताना दिसत आहेत.
सुहास नाईक शहादा-तळोदा मतदासंघांत काँग्रेसचे उमेदवार असतील का.. त्यांना मतदारसंघात कोणाची छुपी मदत तर मिळत नसेल ना... यांसारखे नानाविध प्रश्न यानिमित्ताने चर्चिले जात आहेत. (Suhas Naik meet senior Congress leaders in delhi nandurbar news)
सुहास नाईक हे नाव तालुक्यात सर्वांना परिचित आहे. पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसच्या अनेक आंदोलने, कार्यक्रमांमध्ये भाग घेत सातपुडा पट्यामधील नागरिकांमध्ये तसेच काँग्रेसमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी नुकतीच दिल्ली वारी केली. विशेष म्हणजे त्यांना काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी त्यांना वेळ देखील दिला.
प्रमुख नेते राहुल गांधी यांच्यासमवेत अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महासचिव के. सी. वेणुगोपाल, भारत जोडो अभियानाचा संयोजक प्रतिभा शिंदे बैठकीत उपस्थित होते. बैठकीत काय चर्चा झाली, याबाबत विविध कयास लावण्यात येत असून, बैठकीची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
पद्माकर वळवींना पर्याय?
माजी मंत्री पद्माकर वळवींना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. विशेषतः सातपुडा पट्ट्यात त्यांचे स्वतःचे जाळे आहे. विधानसभेच्या दोन निवडणुकांत त्यांना पराभव पत्करावा लागलेला असून, मध्यंतरी अक्कलकुवा-धडगाव मतदारसंघासाठी ते प्रयत्नशील असल्याचे बोलले गेले. त्यामुळे भविष्यात शहादा-तळोदा मतदारसंघात सुहास नाईक हे पद्माकर वळवींना पर्याय ठरू शकतात आणि कदाचित त्यासाठीच ही भेट असेल का? असेही राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आमदार पाडवींशी लढत
भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या कार्याच्या जोरावर शहादा-तळोदा मतदारसंघात मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांना टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार म्हणून सुहास नाईक यांचे नाव पुढे करण्यासाठीच ही भेट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भाजपची छुपी मदत?
आमदार पाडवी यांनी आपल्या कार्यशैलीतून नागरिकांसोबतच भाजपच्या वरिष्ठांनाही आपलेसे केले आहे. त्यामुळे मागील काळात ज्या-ज्या वेळी मंत्रीपदाच्या चर्चा झाल्यात त्यावेळी त्यांचे नाव समोर आले.
दरम्यान जिल्ह्यात भाजपात अनेक गटतट असल्याचे विविध घटनांवरून दिसून आले आहे. जिल्ह्यात आमदार पाडवी यांचे वर्चस्व भविष्यात डोकेदुखी ठरू शकते, हे हेरून मतदारसंघातच त्यांना रोखावे यासाठी भाजपच्या एक स्ट्रॉंग गट सुहास नाईक यांना छुपी मदतदेखील करू शकतो, अशीही चर्चा राजकीय आखाड्यात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.