Nandurbar News: कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

-
Suicide of  farmer in nandurbar
Suicide of farmer in nandurbar esakal
Updated on

Nandurbar News: सैताणे (ता. नंदुरबार) येथील शेतकरी सुदाम गोपीचंद सोनवणे (वय ४९) यांनी कर्जबाजारी झाल्याने २९ सप्टेंबरला शेतात गळफास घेवून आत्महत्या केली.

सैताणे या गावाला दरवर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी यामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत.

यातच शनिमांडळ येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून व इतर घेतलेले कर्ज आणि त्यावरील व्याज दिवसेंदिवस वाढत असल्याने नैराश्यातून आत्महत्या केली.(Suicide of farmer in nandurbar news )

सैताणे येथील सुदाम गोपीचंद सोनवणे (वय ४९) यांची बलवंड शिवारातील सुमारे आठ एकर शेती आहे. यावर्षी शेतीच्या भांडवलसाठी घेतलेले पीक कर्ज फेडण्यासाठी रात्रंदिवस शेतात मेहनत करत होते.

मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या तीन ते चार वर्षापासून सतत असणारा दुष्काळ व यामुळे शेतात केलेला खर्चही निघेनास झाला. शिवाय सैताणे येथील अमरावती नदीला यावर्षी एकदा सुद्धा पाणी आलेले नाही. दिवसेंदिवस कुटुंबाचा गाडा चालविणे कठीण होत होते.

Suicide of  farmer in nandurbar
Nandurbar Accident News: अनरदबारी येथे ट्रक-स्कुटीच्या अपघातात अमळनेर तालुक्यातील तरुणी ठार; 2 जखमी

दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत असल्याने व शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने सुदाम सोनवणे यांनी २९ सप्टेंबरला शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृत सुदाम सोनवणे हे तापी बुराई उपसा जलसिंचन योजने लवकरात लवकर व्हावी यासाठी रनाळे येथे रास्तारोको साठी सुद्धा हजर होते. एकूणच नंदुरबार तालुक्यातील अशा बऱ्याच शेतकरी आत्महत्या या पूर्व पट्यात यापूर्वी झाल्या आहे.

Suicide of  farmer in nandurbar
Nandurbar Accident News: अनरदबारी येथे ट्रक-स्कुटीच्या अपघातात अमळनेर तालुक्यातील तरुणी ठार; 2 जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()