Sunny Salve Case : सनी साळवे खून खटल्यातील दोघांचे जामीन अर्ज नामंजूर

Murder
Murderesakal
Updated on

धुळे : शहरातील देवपूर भागातील सनी साळवे खून खटल्यातील आरोपी दीपक फुलपगारे व वैभव गवळे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने (Court) नामंजूर केला. (sunny salve case Bail application of accused in murder case rejected by court dhule crime news)

दरम्यान, या खटल्यात साक्षीदारांची सरतपासणी व उलटतपासणी पूर्ण झाली असून, पुढील कामकाजात तपास अधिकाऱ्यांची साक्ष होणार आहे.

धुळे शहरातील चंदननगर येथील रहिवासी सनी साळवे याचा १८ एप्रिल २०१८ ला सशस्त्र हल्ल्यात खून झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदारांची तपासणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.

सनी साळवे खून खटल्यातील संशयित दीपक फुलपगारे व वैभव गवळे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर २ फेब्रुवारीला आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Murder
Nashik News : Citylincचा तोटा भरण्यासाठी 85 कोटी तरतूद करण्याची मागणी

त्यावर सरकार पक्षाने तीव्र हरकत घेतली, तसेच आरोपींना जामीन देण्यात येऊ नये यासाठी जोरदारपणे विरोध करत जामीन अर्ज नामंजूर होण्यासाठी युक्तिवाद केला.

दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने मंगळवारी (ता. ७) आरोपी दीपक फुलपगारे व वैभव गवळे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला. हे दोन्ही आरोपी अटक झाल्यापासून तुरुंगात आहेत. या खून खटल्याचे कामकाज न्या. एम. जी. चव्हाण यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील श्यामकांत पाटील काम पाहत असून, ॲड. विशाल साळवे त्यांना मदत करत आहेत.

Murder
NMC News : आकडेवारीवरून विभागांमध्ये घोळ! अनधिकृत मालमत्ता शोध मोहिमेत असमन्वयाचा अभाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.