Salve Crime Case : जखमी साक्षीदार साळवेची धुळ्यात उलटतपासणी पूर्ण

murder
murderesakal
Updated on

धुळे : देवपूरमधील सशस्त्र हल्ल्यातून खून झालेल्या सनी साळवे खून प्रकरणी न्यायालयात प्रत्यक्षदर्शी जखमी साक्षीदार सौरभ साळवे याची उलटतपासणी पूर्ण झाली आहे.सौरभ साळवे या हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्याच्यावर सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये हल्ला करण्यात आला होता. (sunny salve murder case eyewitness salve Cross examination completed dhule crime news)

नंतर सनी साळवेला सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. त्यावेळी हॉस्पिटलच्या बाहेर सौरभवर हल्ला करण्यात आला होता. न्यायालयात साक्ष सुरू असताना साक्षीदाराला सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यात आले.

त्या आधारावर उलटतपासणीत विविध प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. ज्या आरोपींनी सौरभला मारहाण केली, त्या आरोपींना सौरभने न्यायालयात दाखविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ओळखले.

साक्षीदार सौरभ याने स्वतः सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये मृत सनीला दाखल केले होते, असे सांगितले. सिद्धेश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या घटनादेखील त्याने सविस्तरपणे सांगितल्या. खून खटला न्या. एम. जी. चव्हाण यांच्या समक्ष सुरू आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

murder
Dhule News : 57 रस्ते ‘कात’टाकणार; खासदार डॉ. सुभाष भामरेंच्या पाठपुराव्याने 40 कोटींचा निधी मंजूर!

चंदननगरातील सनी साळवे याचा १८ एप्रिल २०१८ मध्ये खून झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात कामकाज सुरू आहे. घटनेतील प्रत्यक्षदर्शी जखमी साक्षीदार सौरभ साळवे खून खटल्यातील सर्वच आरोपींच्या वकिलांनी घेतलेली सौरभची उलटतपासणी पूर्ण झाली असून दोन फेब्रुवारीला पुढील कामकाज होणार आहे.

विशेष सरकारी वकील ॲड. श्यामकांत पाटील कामकाज पाहात आहेत. सरकार पक्षाला ॲड. विशाल साळवे सहकार्य करत आहेत. ॲड. नीलेश दुसाने यांनी आरोपींना जामीन मिळू नये यासाठी मूळ फिर्यादीतर्फे जामीन अर्जावर युक्तिवाद केला आहे. उलटतपासणीचे कामकाज सुरू असताना न्यायालयात गर्दी झाली होती.

murder
Dhule News : योजना 154 कोटींची; तरीही जलकुंभ कोरडेच? शिवसेनेच्या ठाकरे गटाचा वार कोणावर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.