Dhule News : ‘त्यांचं’ एवढं काय नडलंय पळायला!; पोलिस अधीक्षक बारकुंड

Dhule District Superintendent of Police Sanjay Barkund
Dhule District Superintendent of Police Sanjay Barkundesakal
Updated on

धुळे : जिल्ह्यात कोरोनाचा संकट कालावधी आणि नंतरही मुला-मुलींचे, विवाहितांच्या पळण्याचे प्रमाण वाढते आहे. याविषयी विविध पातळ्यांवर चिंता व्यक्त होत असतानाच एका वार्तालापात ‘त्यांचं एवढं काय नडलंय पळायला!’ अशी खेदजनक भूमिका मांडत जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी कौटुंबिक सुसंवाद वाढविण्याची गरज व्यक्त केली. (Superintendent of Police Barkund statement over increasing rate of running away of boys and girls married people Dhule News)

गेल्या दोन वर्षांपासून सद्यःस्थितीपर्यंत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत रोज मुले-मुली, विवाहिता पळून जाण्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. बेपत्ता, अपहरण अशा स्वरूपाच्या त्या तक्रारी दाखल होत आहेत. दोन्ही पक्षांचे सदस्य पोलिस ठाण्यात कलह करत असल्याने किंवा मुलीचे मातापिता चिंतेतून पोलिसांकडे शोधासाठी तगादा लावत असल्याने पोलिस ठाण्यांमध्ये कटकटी, कामाचा ताण वाढत आहे.

मुले-मुली, विवाहिता पळून जण्यामागच्या कारणांमुळे पोलिस वर्ग खासगीत चर्चेवेळी अधिकच चिंता व्यक्त करताना दिसतो. शिवाय अनैतिक संबंधांचे वाढते प्रमाणही चिंताजनक आहे. जिल्ह्याला भेडसावणारा हा ज्वलंत सामाजिक प्रश्‍न जागृत संस्था, संघटना, चळवळींनाही हाताळावा लागणार आहे. यात धाडस करत काही पीडित पालक पोलिस ठाण्यांपर्यंत पोचतात. ते वगळता बऱ्याच अशा काही घटना रेकॉर्डवर येत नाहीत.

Dhule District Superintendent of Police Sanjay Barkund
Nashik News : नाशिकमधील ठाकरे गटाला खिंडार!; 12 माजी नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल

काय जाणीव ठेवतो?

या पार्श्वभूमीवर संवाद साधला असता पोलिस अधीक्षक बारकुंड म्हणाले, की जिल्हा पोलिस दलाकडे येणाऱ्या अशा काही तक्रारींचा बारा तासांत किंवा पाच दिवसांत निपटारा करण्याचा कसोशीने प्रयत्न होत आहे. मुले-मुली, विवाहिता पळून जाण्यामागच्या कारणांची जंत्री मोठी आहे.

यातही मुले-मुली मोबाईल, सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने असे प्रकार घडत आहेत. शाळा, कॉलेज, क्लास सुटला की मुले-मुली चॅटिंगच्या नादी लागतात. चुकीच्या साइट हाताळतात. त्यामुळे गैरप्रकारांना प्रवृत्त होणे किंवा त्याचे प्रमाण वाढत जाते. यातून मग चुकीच्या पद्धतीने मोबाईल हाताळल्याने मुले-मुली फसतात किंवा बळी पडतात आणि गैरप्रकारांना वाव मिळतो.

अभ्यासात एकाग्रता नसल्याने, आपले मातापिता आपल्याला घडविण्यासाठी काय कष्ट उपसतात त्याची जाणीव ‘त्या’ मुला-मुलींकडून ठेवली जात नसल्याने, संसाराचा रहाटगाडा हाकताना आपला पाल्य कधी घरी येतो, जातो, शाळा-कॉलेज-क्लास नीट करतो की नाही, मित्रमैत्रीणी कोण, त्याच्याशी आपण रोज सुसंवाद साधतो की नाही याचा विचार पालक वर्गानेही करण्याची गरज वाटते.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Dhule District Superintendent of Police Sanjay Barkund
Nashik News : आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तपदी नयना गुंडे नियुक्त

पळण्याचा असा ‘ट्रेंड’

शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मित्रमैत्रिणींची ओळख होते. दिवाळीपर्यंत शाळा, कॉलेजला जाणे नियमित असते. नंतर डिसेंबर ते मेपर्यंत मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढत जाते. यात शाळा, कॉलेज किंवा गल्ली, कॉलनी, शेजारी वा ओळख झालेल्यांमध्ये मुले-मुली पळून जाण्याचे प्रकार दिसतात. यातही १८ वय वर्षे पूर्ण होण्याचे दिवस मोजून पळून जाणारेही दृष्टिपथास पडतात. त्यांचं एवढं काय नडलंय की त्यांना पळून जाणे महत्त्वाचे वाटते.

या कृतीमुळे आपल्या आई-वडिलांची, भावा-बहिणीची काय मानसिक स्थिती होत असेल याचा त्यांनी एकदा विचार करावा. लग्नच करायचे तर आई-वडिलांना सांगून, विश्‍वासात घेऊन, सुसंवाद साधण्याचाही प्रयत्न व्हायला हवा. पालक-पाल्य सुसंवाद वाढल्याशिवाय परिणामकारकता दिसणार नाही, असेही मत पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी मांडले.

Dhule District Superintendent of Police Sanjay Barkund
Dhule Crime News : कारसह पावणेतीन लाखांचा देशी दारूसाठा साक्रीतून जप्त

पळण्यापूर्वी पडताळणी तर करा...

मुला-मुलींनी पळून जाण्यापूर्वी स्वतःची एकदा पडताळणी करून पाहावी. मुलगा कमावता आहे का, तो पोसू शकायला सक्षम आहे का, संस्कार कसे, असे प्रश्‍न मनाला पडायला हवेत. मुलीला पळवून नेले तर तिच्या कुटुंबावर काय परिणाम होईल याचा मुलांनी विचार करायला हवा. याविषयी आणि मातापित्यांबाबत पळून जाणाऱ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.

सद्यःस्थितीत पळून जाणारे सुरत येथे लग्न करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनातर्फे पोलिस-विद्यार्थी सुसंवाद मेळाव्याचा उपक्रम सुरू केला आहे. पोलिस प्रशासनाच्या पातळीवर हा प्रश्‍न संवेदनशीलतेने हाताळण्याचा प्रयत्न होत आहे, असेही पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी सांगितले.

Dhule District Superintendent of Police Sanjay Barkund
Nashik News : सकाळ सर्कलसह शहरातील 28 ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसविणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.