Dhule Crime News : परसामळ (ता. शिंदखेडा) येथील शेतकऱ्याच्या भडणे गावशिवारातील शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारींवर चोरट्यांनी शनिवारी (ता. २८) रात्री डल्ला मारला होता.
रविवारी (ता. २९) शिंदखेडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.(Suspect arrested in 24 hours due to electric cars stolen dhule crime news)
पोलिसांनी तपासचक्रे फिरवून दोन चोरट्यांना सोमवारी (ता. ३०) जेरबंद करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करत आरोपींना शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
परसामळ येथील शेतकरी सुनील आनंदसिंह गिरासे यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीवरील दोन व इतर दोन शेतकरी यांच्या दोन इलेक्ट्रिक मोटारी लहू अर्जुन भिल (वय २७) व संजय भावा भिल (३३, दोघे रा. परसामळ) यांनी शनिवारी रात्री लांबविला होत्या. सुनील गिरासे यांच्याकडे लहू भिल सालदार आहे.
शिंदखेडा रेल्वेस्थानक परिसरातील दोन जण चोरीत सहभागी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी वेगवेगळी तपासपथके तयार करून त्यांना योग्य त्या सूचना देत पोलिस कर्मचारी बिपीन पाटील, चेतन माळी, पूनमचंद कोळी व पंकज कुलकर्णी यांनी शिंदखेडा रेल्वेस्थानकाजवळ आढळल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दीपक पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे, पोलिस उपनिरीक्षक मिलिंद पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हेमंत फुलपगारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र मांडगे यांनी कारवाई केली.
दोघांकडून चोरीस गेलेल्या तीन इलेक्ट्रिक मोटारी व अन्य साहित्य असा एकूण ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अवघ्या २४ तासांत शिंदखेडा पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हेमंत फुलपगारे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.