Dhule Crime : येथील लोणेश्वरी भिलाटीमधील संशयित आरोपीस ७५ हजार रुपये किमतीच्या ११ मोबाईलसह पिंपळनेर पोलिसांनी अटक केली. (Suspect arrested with mobile items Call for mobile identification Dhule Crime)
पिंपळनेर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांचे आदेशान्वये शनिवारी (ता. १९) रात्री अकराच्या सुमारास पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरिक्षक अशोक पवार, हवालदार प्रकाश सोनवणे, पोलिस नाईक भास्कर सूर्यवंशी, पोलिस नाईक प्रकाश मालचे पेट्रोलिंग करीत असताना बसस्थानक परिसरात एक व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून संशयितरीत्या फिरताना दिसली.
पोलिस गाडी पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिस नाईक प्रकाश मालचे यांनी पळत जाऊन त्याचा पाठलाग केला व त्यास पकडण्यात यश आले.
विचारपूस करता त्याचे नाव यादू ऊर्फ याद्या रमेश देसाई (वय २६, रा. लोणेश्वरी भिलाटी, पिंपळनेर, ता. साक्री) असे सांगितले. पोलिसांना रेकॉर्डवरील हिस्ट्रिशीटर असल्याची खात्री झाली.
पोलिसांना संशय बळावल्याने झडती घेताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पिशवीत ७५ हजार रुपये किमतीचे ११ मोबाईल मिळाले.
संशयित आरोपी देसाई पिंपळनेर पोलिस ठाणे रेकॉर्डवरील हिस्ट्रिशीटर असल्याने प्रत्येक मोबाईलची राष्ट्रीय मोबाईल उपकरणाद्वारे मोबाईलची ओळख पटविण्यात आली असून, मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास असई अशोक पवार करीत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नागरिकांना आवाहन
आपले मोबाईल चोरीस किंवा हरवले असल्यास पोलिस ठाण्यात येऊन ओळख पटवून खात्री करावी, असे आवाहन पिंपळनेर पोलिस ठाण्यातर्फे नागरिकांना करण्यात आले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, असई अशोक पवार, लक्ष्मण गवळी, हवालदार प्रकाश सोनवणे, कांतिलाल अहिरे, पोलिस नाईक प्रकाश मालचे, भास्कर सूर्यवंशी, विजयकुमार पाटील, हेमंत पाटोळे, दावल सूर्यवंशी, राकेश बोरसे, नरेंद्र माळी, पंकज वाघ, सैंदांण यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.