धुळे : शहरातील जमनागिरी भिलाटी येथे रविवारी (ता. १५) उघडकीस आलेल्या महिलेच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी २४ तासांत संशयिताला शिर्डी येथून बेड्या ठोकल्या.
पोलिस निरीक्षक आनंद कोकरे व सहकाऱ्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पोलिस निरीक्षक कोकरे व पथकाला पाच हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर केला. (Suspect in womans murder case Performance of city police Dhule Crime News)
धुळे शहरातील साक्री रोडवरील जमनागिरी भिलाटीत रविवारी महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली. नीता वसंत गांगुर्डे (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी महिलेचा भाऊ सचिन वसंत गांगुर्डे (२८, रा. रमाबाई आंबेडकरनगर, ग.नं. ९, देवपूर, धुळे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
बहीण नीता हिला बादल रामप्रसाद सोहिते/नाहार (४०) याच्यासोबत लग्न करावयाचे म्हणून मार्च २०२० पासून घरातून निघून गेली होती. बादल सोहिते व नीता हे दोघे चार-पाच महिन्यांपासून जमनागिरी भिलाटीत एकत्र राहत होते. दरम्यान, बादल सोहिते नीताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा.
१४ जानेवारीला रात्रीही त्याने नीतास चारित्र्याच्या संशयावरून चेहऱ्यावर मारहाण करून तिचा खून करून फरारी झाला होता. बादल सोहिते याच्याविरोधात धुळे शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कोकरे यांनी तपासाची चक्रे फिरविली.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक धनवटे, कुंदन पटाईत, नीलेश पोतदार, मनीष सोनगिरे यांच्या पथकाने गुन्ह्यातील फरारी संशयित बादल सोहिते याला शिर्डी येथून ताब्यात घेतले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक दादासाहेब पाटील तपास करत असून, त्यांना कामकाजात मच्छिंद्र पाटील, विजय शिरसाठ, अविनाश कराड, प्रवीण पाटील, तुषार मोरे, शाकीर शेख, गुणवंत पाटील, प्रसाद वाघ, महेश मोरे, गौरव देवरे सहकार्य करत आहेत. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.