Dhule Crime : अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी आणलेला संशयित आरोपी सागर कारखेले हा पोलिसांच्या हाताला झटका देऊन फरारी झाला आहे. (Suspected accused Sagar Karkhele escaped from police dhule crime)
संशयित लघुशंकेसाठी थांबला असताना पोलिसांना झटका देत फरारी झाल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपजिल्हा रुग्णालयाजवळ बुधवारी (ता. ६) रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली.
तळोदा पोलिसांनी एका गुन्ह्यात संशयित आरोपी सागर बंडू कारखेले (वय २२, रा. तिसगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यास ताब्यात घेतले होते. या संशयित आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करण्यासाठी एक पोलिस व होमगार्ड उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अटकपूर्व वैद्यकीय तपासणी व गुन्ह्याच्या अनुषंगाने असलेली वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्यास तळोदा पोलिस ठाणे येथे परत आणत असताना संशयित लघुशंकेसाठी थांबला असताना पोलिसांच्या हाताला झटका देऊन फरारी झाला.
त्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक सागर गाडीलोहार तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरारी झालेल्या संशयिताच्या अटकेचे आव्हान पोलिसांसमोर असून, घटनेतील निष्काळजीपणाने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.