Dhule Crime News : पोलिसांनी पकडलेले संशयित निघाले सराईत गुन्हेगार; मराठवाड्यात तब्बल 25 गुन्हे

Police Inspector A. along with the arrested suspects. S. Agarkar and Associates. The second photo shows the items seized from the suspects.
Police Inspector A. along with the arrested suspects. S. Agarkar and Associates. The second photo shows the items seized from the suspects.esakal
Updated on

Dhule Crime News : शहर पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अटक केलेले दरोड्याच्या तयारीतील संशयित सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

त्यांच्यावर मराठवाड्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न, चोरी, पोलिसांच्या ताब्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न, गांजाची तस्करी असे गंभीर स्वरूपाचे एकूण २५ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती निरीक्षक ए. एस. आगरकर यांनी दिली.( suspects caught by police turned out to be criminals dhule crime news)

सावळदे (ता. शिरपूर) येथे पोलिसांनी १ नोव्हेंबरला रात्री संशयावरून मारुती सुझुकी इको (एमएच ३९, एबी ८१९३) ला थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने भरधाव शहराच्या दिशेने पळ काढला. खर्दे (ता. शिरपूर) येथील शनिमंदिराजवळ वाहन थांबविण्यात पोलिसांना यश आले. मात्र दोन संशयित अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाले.

पाठोपाठ पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. मुकद्दरसिंह टाक (वय ३८, रा. लोणार, जि. बुलडाणा), तकदीरसिंह टाक (२४) व कलदारसिंह टाक (५५, दोघे रा. जालना) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून तलवार, चाकू, कटर, पकड, टॅमी, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा, बॅटरी, मिरचीपूड, दोरी, दगड आदी साहित्य जप्त करण्यात आले.

कारसह या मुद्देमालाची किंमत पाच लाख पाच हजार ६२० रुपये आहे. शिरपूर न्यायालयासमोर हजर केले असता संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

कारही चोरीचीच

संशयितांकडून जप्त केलेली मारुती इको कारदेखील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. संशयितांनी २९ ऑक्टोबरला रात्री तळोदा (जि. नंदुरबार) येथील श्रेयस कॉलनीमधून ही कार चोरली होती. त्याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संशयितांना अटक करतानाच शिरपूर पोलिसांनी कारचोरीचा गुन्हाही उघडकीस आणला.

Police Inspector A. along with the arrested suspects. S. Agarkar and Associates. The second photo shows the items seized from the suspects.
Dhule Crime News : सराईत दुचाकीचोर जेरबंद; कारवाईत 5 दुचाकी जप्त

कानून हमको भी पता है!

संशयितांना अटक केल्यानंतर त्यांना शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे संशयितांनी आपल्यावर कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल केला याबाबत विचारणा केली. ‘दरोडा टाकण्याचा आमच्यावर केवळ संशय असल्याची कलमे लावा, जास्त गंभीर कलमे लावू नका, कानून हमको भी पता है’ असे त्यांनी सुनावले. त्यामुळे संशयित अनेकदा तुरुंगवारी करून आल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांची कुंडली बाहेर काढली.

तीन लोक, २५ गुन्हे

पोलिसांनी अटक केलेला संशयित मुकद्दरसिंह टाक याच्यावर सिंदखेडराजा, मंठा, जालन्यातील कदिम व सदर बाजार, पाचोड (ता. पैठण) येथे घरफोडीचे आठ, दरोड्याच्या प्रयत्नाचा एक व चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

दुसरा संशयित तकदीरसिंह टाक याच्याविरोधात सिल्लोड, मेहकर, भोकरदन, करमाड, पारध, बीबीनगर, वडोद बाजार व कन्नड येथे घरफोडीचे आठ, चोरीचे तीन व पोलिसांच्या ताब्यात असताना आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा एक असे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. संशयित कलदारसिंह टाक याच्याविरोधात सदर बाजार, जळुका येथे गांजाची तस्करी केल्याचा एक व घरफोडीचा एक गुन्हा दाखल आहे.

मराठवाड्यातील मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीतील तिघांना अटक झाल्याने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Police Inspector A. along with the arrested suspects. S. Agarkar and Associates. The second photo shows the items seized from the suspects.
Dhule Crime News : गांजासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल एलसीबीकडून जप्त

वरिष्ठांकडून कौतुक

दरोड्यापूर्वीच संशयितांना अटक करण्याची कामगिरी बजावल्याबद्दल पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

आगरकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गणेश कुटे, हवालदार ललित पाटील, रवींद्र आखडमल, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटू साळुंखे, सचिन वाघ, आरिफ तडवी, मनोज महाजन, रोहित गांगुर्डे, विवेकानंद जाधव, जितेंद्र मालचे, रवींद्र महाले, होमगार्ड मिथून पवार, राम भिल, चेतन भावसार, शरद पारधी यांनी ही कारवाई केली.

Police Inspector A. along with the arrested suspects. S. Agarkar and Associates. The second photo shows the items seized from the suspects.
Dhule Crime News : मुलींची छेडखानी महागात; देवपूरच्या घटनेप्रकरणी दोघे 6 महिने तुरुंगात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.