Dhule News : जिल्ह्यात 205 जागांवर भरती; 17 जुलैला अर्जासाठी अंतिम मुदत

Talathi Post News
Talathi Post Newsesakal
Updated on

Dhule News : अनेक दिवसांपासून प्रलंबित महसूल विभागातील तलाठी भरतीला अखेर मुहूर्त मिळाला. तलाठी भरतीचे महसूल व वन विभागाने २३ जूनला प्रकटन केले.

त्यासाठी २६ जून ते १७ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करावे लागतील. परीक्षेची तारीख htpp://mahachumi.gov.in वर नंतर जाहीर केली जाणार आहे. ही परीक्षा जिल्हा केंद्रावर ऑनलाइन घेण्यात येईल.(Talathi Post Last date for application is 17th July Recruitment for 205 seats in the district Dhule News)

जिल्ह्यात तलाठ्यांची रिक्त पदे तसेच नव्याने निर्माण केलेल्या पदांची भरती होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात २०५ तलाठीपदे भरली जातील. तलाठ्यांची ६७ पदे मंजूर आहेत. शिवाय राज्य शासनाने नव्याने १६६ पदे मंजूर केली आहेत.

जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता १८, अनुसूचित जमाती १३, वि.जा.अ. व भ.ज.ब. प्रत्येकी दोन, भ.ज.क. चार, भ.ज.ड., वि.मा.प्र. प्रत्येकी तीन, इ.मा.व. ३१, ईडब्ल्यूएस १७, अराखीव ६३ आणि पेसाची ४९ अशी एकूण २०५ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

यात सर्वसाधारण ६७, महिलांसाठी ६३, खेळाडू १०, माजी सैनिक ३०, प्रकल्पग्रस्त १०, भूकंपग्रस्त ४, दिव्यांग आठ, पदवीधर अंशकालीन २१ आणि अनाथ प्रवर्गासाठी दोन अशा एकूण २१५ जागा आरक्षित आहेत.

Talathi Post News
Nashik News : शहरात Triple Seat स्वार सुसाट; वाहतूक शाखेचा अघोषित परवाना?

स्वतंत्र प्रश्नपत्रिका

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये, तर राखीव उमेदवारांना नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे. ही परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांत होईल. त्यामुळे प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्र असतील.

परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार असली, तरी परीक्षार्थींची निवडयादी प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र असेल. मराठी विषयासह इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/अंक गणित विषयाच्या परीक्षेसाठी प्रत्येकी २५ प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण याप्रमाणे एकूण १०० प्रश्नांकरिता २०० गुण असतील. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे.

तथापि, पेसा (अधिसूचित क्षेत्र) क्षेत्रातील तलाठी भरती मात्र स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची होईल. तलाठी भरतीसाठीचे आरक्षण महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण धोरणाप्रमाणे राहील. खुल्या वर्गासाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आहे, तर वयाचा गणांक १७ जुलै २०२३ असा राहील. कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर अशी परीक्षेची शैक्षणिक अर्हता आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी

Talathi Post News
Nashik News : जिल्ह्यात 250 शिक्षकांचे निवृत्तिवेतन थकले; पालकमंत्र्यांसमोर केंद्रप्रमुख संघाची कैफियत

इच्छुकांवर दुहेरी आघात

तलाठी भरतीसाठी या वर्षीपासून जिल्हानिहाय सूत्र रद्द केले आहे. सामायिक परीक्षेद्वारे निवडप्रक्रिया राबविली जाईल.

या भरतीसाठी पूर्वी जिल्हानिहाय प्रश्नपत्रिका काढल्या जात होत्या. शिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या भरतीचे वेळापत्रकही वेगवेगळे असायचे

Talathi Post News
Dhule Crime News : कदाणेतील महिला सरपंचाला चौघांकडून मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.