Dhule Accident News : शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुद्वारासमोरील उड्डाणपुलावर डिझेलने भरलेला टँकर मंगळवारी (ता. २) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास उलटला.
या अपघातानंतर टँकर पुलाच्या कठड्यासह वीजखांबाला धडकला. सुदैवाने मोठी हानी टळली. या वेळी रस्त्यावर वाहून जाणारे डिझेल भरून नेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत वाहतूक बंद केली. (tanker full of diesel overturned on flyover Dhule Accident News )
गुजरातमधून जळगावकडे जाणारा डिझेल टँकर (जीजे १२, बीव्ही ०५५५) धुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वारासमोरील उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने उलटला. टँकरमध्ये १२ हजार लिटर डिझेल होते. या अपघातात टँकरचालक जखमी झाला आहे.
अपघातामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. टँकर पुलावरील कठड्याला जाऊन आदळला. कठड्यावर असलेल्या हायमास्टलाही टँकरचा जोरदार दणका बसल्याने हायमास्टचा खांब वाकला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सुदैवाने हायमास्ट तुटला नाही. जर तो तुटला असता तर वीज कंपनीच्या हाय टेंशन लाइनवर पडला असता त्यातून मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने असे काहीही झाले नाही.
दरम्यान, घटनेची माहिती कळताच चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे एपीआय धीरज महाजन, पीएसआय गवारे, अविनाश पाटील, गायकवाड, श्री. खैरनार घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे त्यांनी हा मार्ग एकाबाजूने बंद केला.
पीएसआय चुनीलाल सैंदाणे, विशाल मोहने, एएसआय मनोहर पाटील, थोरात, पाटील यांच्यासह अग्निशामक दलाच्या दोन गाड्या, लळिंग टोलवेची गाडी घटनास्थळी दाखल झाली. टँकरमधील या घटनेत टँकरमधील डिझेल वाहून गेले. दरम्यान, टँकरमधील डिझेल भरून नेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यांना नंतर पोलिसांनी पांगवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.