जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नअंतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी आमदार काशिराम पावरा यांनीही आमदार निधी दिला आहे.
शिरपूर (धुळे) : तापी नदीचे (Tapi River)बॅक वॉटर (Back Water) नैसर्गिकरीत्या नाल्यात आणून त्यावर थाळनेर (ता. शिरपूर) परिसरातील सुमारे सहा हजार हेक्टर शेती फुलवली जाणार आहे. कोणताही जादा खर्च न करता परिसरातील अनेक गावांचे शिवार हिरवेगार करणाऱ्या या कामाला सुरवात झाली आहे. (Tapi backwaters will cultivate over six thousand hectares of land)
माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी प्रयोग सुरू आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी या कामासाठी विशेष पाठपुरावा केला. पावसाळ्यात पाण्याच्या लोंढ्यामुळे पूर्ण क्षमतेने भरणाऱ्या सुलवाडे (ता. शिरपूर) येथील प्रकल्पातील पाणी (बॅक वॉटर) सिंचनासाठी वापरात आणले जाणार आहे. जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नअंतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी आमदार काशिराम पावरा यांनीही आमदार निधी दिला आहे.
अशी आहे कार्यपद्धती
पावसाळ्यात सुलवाडे बॅरेज पूर्ण क्षमतेने भरते. त्याची पूररेषा १३३ मीटर आहे. या मर्यादेपर्यंत भरल्यानंतर तापीच्या बॅक वॉटरचा प्रवाह थाळनेरपर्यंत पोचतो. थाळनेरजवळ तापी नदीची पातळी १२२ मीटर आहे. पाडळसरे (ता. अमळनेर) येथील तापी निम्न प्रकल्पाची ग्राउंड लेव्हल १३३ मीटर आहे. त्यामुळे या पाण्याचा पुरेपूर उपयोग थाळनेरजवळ धरमखोई नाला भरण्यासाठी केला जातो. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत या नाल्यात दहा फुटापर्यंत पाणी असते. यापूर्वीच धरमखोई नाल्याचे दोन किमी अंतरापर्यंत १३० मीटर खोलीकरण केले असून, त्यामुळे परिसरातील कूपनलिकांची २०० फुटांखाली खालावलेली भूजलपातळी सध्या ६० फुटापर्यंत आली आहे. मात्र, त्यापुढील कामाला रस्त्याचा अडथळा होता. आमदार पटेल यांनी मार्ग काढल्यानंतर हे काम आणखी पाच किमीपर्यंत पुढे नेणे शक्य झाले असून, त्यामुळे सुमारे शेकडो शेतकऱ्यांची सहा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, एकनाथ जमादार, सर्जेराव पाटील, अविनाश पाटील, अॅड. प्रताप पाटील, विजय बागूल, भुलेश्वर पाटील, अशोक पाटील, योगेश बोरसे, सुरेश पाटील, जितेंद्र सूर्यवंशी, अभियंता के. यू. सोनवणे, माळी उपस्थित होते.
धरमखोई नाल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर थाळनेरसह गोदी, मांजरोद, भोरटेक, सावेर, भोरखेडा, जापोरा, अजनाड आदी गावांची सुमारे सहा हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येईल. गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वाने तापीचे अतिरिक्त पाणी नाल्यात पोचणार आहे. कूपनलिकांची जलपातळी वाढेलच, पण कमी अश्वशक्तीचे पंप वापरल्याने वीजबिलातही भरीव बचत होईल. रब्बी हंगामात मोठे उत्पन्न घेणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.
- के. डी. पाटील, माजी उपाध्यक्ष, धुळे जिल्हा परिषद
(Tapi backwaters will cultivate over six thousand hectares of land)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.