Nandurbar News : चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीला ठोकल्या बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Crime News
Crime Newsesakal
Updated on

नंदुरबार : शहरातील श्रीजी दीपज्योती डाय कटर्स दुकानातून सोनेमिश्रित साडेतीन लाखांची माती गेल्या महिन्यात चोरीस (Theft) गेली होती. (team of local crime branch arrested thieves inter state gang on 22 march nandurbar crime news)

त्याच्या तपासाला वेग देत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. २२) आंतरराज्यीय टोळीला अटक केली. त्यांनी चोरीची कबुली देत त्यांच्याकडून १० लाख ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यज्ञेश महेश सोनी यांच्या नंदुरबार शहरातील शहीद शिरीष मेहता रोड, असोदेकर वाडा, जनक आभूषणच्या मागे असलेल्या श्रीजी दीपज्योती डाय

कटर्स दुकानात २६ फेब्रुवारीला सकाळी अकराच्या सुमारास त्यांचे वडील महेश कांतिलाल सोनी एकटेच होते. त्यांना बोलण्यात गुंतवून अनोळखी चौघांनी पाच ते सहा किलो वजनाची सोनेमिश्रित माती चोरून नेली होती. तिची किंमत साडेतीन लाख होती. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तपास सुरू असताना मंगळवारी (ता. २१) पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना माहिती मिळाली, की श्रीजी दीपज्योती डाय कटर्स या दुकानातून सोनेमिश्रित माती चोरून नेणारे संशयित मारुती सुझुकी अर्टिगा वाहना (जीजे ०३, एलजी ०९०७)ने धुळ्याकडून नंदुरबारमार्गे गुजरातमधील राजकोट येथे जाणार आहेत. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितले. श्री. खेडकर यांनी पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Crime News
Market Committee Election : शिंदेंची शिवसेना बाजार समितीच्या रिंगणात? नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलणार

पथकाने नंदुरबार शहरातील धुळे चौफुली येथे बॅरिकेडिंग लावून वाहनांची तपासणी करीत असताना एक पांढऱ्या रंगाची अर्टिगा धुळ्याकडून येऊन नाकाबंदीच्या ठिकाणी थांबली.

वाहनातील व्यक्तींना नाव-गाव विचारले असता गाडी चालविणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव विजय करसनभाई गोहील (वय ४०, रा. चुनारवाड, माजेवाडी दरवाजा, जुनागड), पुढील सीटवर त्याच्या बाजूला बसलेल्याने प्रवीण भिकूभाई दोडिया (वय ३९, रा. चुनारवाड, स्ट्रीट नंबर २, आजी नदीच्या काठी, मफातीयापरा, भावनगर रोड, राजकोट, ह.मु. सापर, शांतिधाम सोसायटी, गोंडल चौफुलीजवळ, राजकोट), तर मागील सीटवर बसलेल्याने विजयभाई जीवनभाई सोलंकी (वय ३७, रा. चुनारवाड १, नदी का काँटा विस्तार, लखाजीराज, उद्योगनगर, भावनगर रोड, राजकोट) आणि जयदीप धिरूभाई चौहान (वय २८, रा. गल्ली नंबर ५, वेलनाथ सोसायटी, कोठारिया रोड, राजकोट) असे सांगितले.

वाहनाची तपासणी केली असता मागच्या सीटवर काळ्या रंगाची पिशवी आढळली. त्यात सोन्या-चांदीचे कणमिश्रित काळसर माती आढळून आली.

त्यातील चार लाख रुपये किमतीची आठ किलो ३८८ ग्रॅम वजनाची सोने, चांदीचे कणमिश्रित माती, ३१ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल, आठ हजार २०० रुपये, सहा लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची मारुती अर्टिगा गाडी असा एकूण १० लाख ३९ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर कारवाई करून जप्त करण्यात आला.

Crime News
Nashik News : ZP ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सावळागोंधळ! एकाच अभियंत्यांकडे तीन-तीन विभागांचा पदभार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.