शिरपूर (जि. धुळे) : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवैध विक्रीसाठी स्पिरिट उतरवून देणाऱ्या टँकरसह चालकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ५४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हाती लागला. (team of State Excise Department detained tanker along with its driver for offloading spirit for illegal sale dhule news)
महामार्गावर गस्त घालताना ८ फेब्रुवारीला रात्री पथकाला पळासनेर (ता. शिरपूर) येथे अन्नपूर्णा ढाब्याजवळ संशयास्पद अवस्थेत उभी असलेली टँकर व आयशर वाहने आढळली. पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केली असता टँकरमधून स्पिरिट उतरवून प्लॅस्टिक ड्रममध्ये भरले जात असल्याचे दिसून आले.
पथकाला पाहून संशयितांनी पळ काढला. पथकाने शिताफीने टँकरचालकाला ताब्यात घेतले. त्याने टँकरमधून अवैधरीत्या स्पिरिट उतरविले जात असल्याची कबुली दिली.
घटनास्थळावरून ३५ हजार लिटर स्पिरिट भरलेला टँकर (एचआर ३७, डी ००७८), आयशर ट्रक (एमएच १८, एए ५०२), आयशरमध्ये एकूण एक हजार ३७५ लिटर स्पिरिट भरलेले सहा बॅरल्स असा सुमारे ५३ लाख ४० हजार २७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
टँकर ग्रेट गॅलन डिस्टीलरीज (धार, मध्य प्रदेश) येथून स्पिरिट घेऊन देवीकोलम डिस्टिलरीज (केरळ) येथे जात होता. चालक दीपक मनीष प्रशाद याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एस. हांडे, निरीक्षक बी. एस. महाडिक, दुय्यम निरीक्षक बी. एस. चोथवे, प्रकाश अहिरराव, अनिल निकुंभे, जवान एस. एस. देवरे, गोरख पाटील, केतन जाधव, प्रशांत बोरसे, मनोज धुळेकर, जितेंद्र फुलपागरे, अमोल धनगर, दारासिंग पावरा, वाहनचालक नीलेश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.