Dhule Municipality News : मालमत्ता कर, पाणीपट्टी थकबाकी वसुली सुरू

महापालिकेतर्फे मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी नियुक्त पथकांनी सोमवार (ता. १२)पासून कार्यवाही सुरू केली.
Municipal team collecting dues from defaulters in property tax collection drive on Monday.
Municipal team collecting dues from defaulters in property tax collection drive on Monday.esakal
Updated on

Dhule Municipality News : महापालिकेतर्फे मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी नियुक्त पथकांनी सोमवार (ता. १२)पासून कार्यवाही सुरू केली. पहिल्या दिवशी मालमत्ता कर व पाणीपट्टीतून सुमारे २० लाख रुपये वसुली करण्यात आली.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. (teams appointed by dhule Municipal Corporation for collection of property tax and water levy have started action news)

त्यादृष्टीने अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, उपायुक्त व मनपातील सर्व विभागप्रमुख, स्वच्छता निरीक्षक.

कनिष्ठ अभियंता यांच्या नियंत्रणात वसुली अधीक्षक, वसुली निरीक्षक व इतर अधिकारी-कर्मचारी यांचे पथक विभागनिहाय नियुक्त करण्यात आलेले आहे.

या पथकामार्फत मालमत्ता कर थकबाकीची वसुली सोमवार (ता. १२)पासून सुरू झाली. यासाठी एक लाख, ५० हजार, २५ हजार याप्रकारे थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची यादी तयार करण्यात आली असून, अशा थकबाकीदारांकडे प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

Municipal team collecting dues from defaulters in property tax collection drive on Monday.
Dhule News : आता सर्वच जिल्ह्यात हिमोफिलिया डे-केअर सेंटर; रुग्णांच्या आयुर्मानात वाढ

सोमवारी (ता. १२) सायंकाळपर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी करापोटी एकूण सुमारे वीस लाख कर वसूल करण्यात आला.

आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी प्रशासकपदाचा पदभार हाती घेताच थकीत मालमत्ता करधारकांना दिलासा मिळावा म्हणून मार्च-२०२४ अखेर शंभर टक्के शास्तीमाफीची योजना जाहीर केली आहे.

त्यादृष्टीने नागरिकांनीही मालमत्ता कर भरून महापालिकेत सहकार्य करावे व कटू कारवाई टाळावी, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. शहरातील मालमत्ताधारकांकडे चालू मागणीसह थकबाकीची एकूण ७२ कोटी रुपये थकबाकी आहे.

Municipal team collecting dues from defaulters in property tax collection drive on Monday.
Dhule News : आमदारांनी आणले, अभियंत्यांनी गमावले; जैतपूर-थाळनेर रस्त्याची दुरवस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.