Dhule Agriculture News : घरच्या सोयाबीनची उगवणक्षमता तपासा; पेरणीच्या अनुषंगाने आवाहन

soyabean
soyabeanesakal
Updated on

Dhule Agriculture News : सोयाबीन हे स्वयंपरागसिंचित पीक असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील स्वउत्पादित बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच त्याचा पेरणीसाठी वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे. (Test germination of soybeans at home appeal by Agricultural Officer dhule news)

धुळे जिल्ह्यात मागील हंगामात सोयाबीन पीक काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या उगवणक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आधी बियाण्याची घरच्या घरी उगवणक्षमता तपासणी करून घ्यावी. बियाण्याची उगवणक्षमता ७० टक्के असेल तरच पेरणी करावी. ज्या प्रमाणात बियाण्याची उगवणक्षमता येईल त्या प्रमाणात पेरणीसाठी बियाण्याचा प्रतिहेक्टर वापर करणे योग्य ठरेल.

शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन बाजारात न विकता येत्या खरीप हंगामासाठी राखून ठेवावे. स्वत:ची गरज भागवूनदेखील बियाणे शिल्लक राहत असेल तर शिल्लक बियाणे आपल्या मित्रमंडळींना, नातेवाइकांना पेरणीसाठी दिल्यास घेणाऱ्या व देणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल, असा आशावाद श्री. तडवी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

soyabean
Soyabean Bajarbhav देशात टिकून; पाहा व्हिडिओ

अशी घ्या काळजी

शेतकऱ्यांनी वाळलेल्या बियाण्यातील शेंगा, फोलकटे, काडीकचरा, माती, खडे इत्यादी काढून स्वच्छ करावे. स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या नवीन पोत्यात साठवून ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते. त्यामुळे साठवणुकीचे ठिकाण थंड किंवा ओलावाविरहित व हवेशीर असले पाहिजे याची काळजी घ्यावी.

साठवणुकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठविताना पोत्यांची थप्पी सात फुटांपेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता घेणे अतिशय गरजेचे आहे. बियाणे १०० किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना चार पोत्यांपेक्षा जास्त व ४० किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास आठ पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये, अन्यथा सर्वांत खालच्या पोत्यातील बियाण्यांवर जास्त वजन पडून बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.

पोत्यांची रचना उभ्या-आडव्या पद्धतीने करावी, म्हणजे हवा खेळती राहून बियाण्यांची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार बियाणे साठवणूक केलेल्या खोलीमध्ये कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर करावा. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहाय्यकास किंवा कृषी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. तडवी यांनी केले आहे

soyabean
मराठवाड्यात आजचे Soybean Rate किती? | Agrowon Soyabean Rate

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.