अति उच्च दाबाच्या संपर्कात आल्याने बस जळून खाक

यूपीतील घटना; सहा जणांचा मृत्यू झाल्याचा संशय
bus burn
bus burnesakal
Updated on

गाझीपूर (उत्तर प्रदेश) : प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस ११ हजार व्होल्टची अति उच्च दाबाच्या वाहिनीच्या संपर्कात आल्याने जळून खाक झाल्याची घटना गाझीपूर जिल्ह्यात आज सकाळी घडली. यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बस गाझीपूरच्या महारे येथे एका विवाह सोहळ्यासाठी जात होती. पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. जखमींना दवाखान्यात दाखल झाले आहे. आगीची तीव्रता एवढी होती की ती आटोक्यात आणण्याचे धाडस कोणीही दाखविले नाही.

bus burn
Hair Care Tips : हेअर स्टायलिंग आणि कलरिंगमुळे केसांची चमक गेलीय? मग, 'या' नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर

महारे येथे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसमध्ये ३८ प्रवासी होते. मात्र मरदह पोलिस ठाण्याच्या हद्दीत असताना खासगी बस रस्त्यावरील अति उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या संपर्कात आली आणि आग भडकली. त्यामुळे एकच हलकल्लोळ उडाला.आगीचा भडका उडल्याने प्रवासी होरपळून निघाले. या घटनेची माहिती कळाल्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. प्राथमिक अंदाजानुसार सहा जणांचा मृत्यू झाला असून पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

घटनास्थळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथकही दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझीपूर घटनेची माहिती घेतली आहे. जिल्हा प्रशासनाला जखमींच्या उपचारासाठी तातडीने सुविधा पुरविण्याची सूचना केली. या बसमधील एका जखमी महिलेने सांगितले, आम्ही बसमध्ये सुमारे ४० ते ५० जण होतो आणि त्यापैकी बऱ्याच जणांचा मृत्यू झाला असावा. मीरा असे त्या महिलेचे नाव असून त्या म्हणाल्या, वऱ्हाड घेऊन गाझीपूरच्या महारे भागाकडे जात होतो. तेथील महादेवाच्या मंदिरात विवाह सोहळा होणार होता. पण वाटेत प्रवास करताना अचानक आग लागली. मी बसच्या पुढील भागात बसले होते आणि या धक्क्याने बाहेर फेकले गेले. माझी मुले त्या बसमध्ये होती आणि त्यांना देखील आगीची झळ बसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.