...अन् चोरीला गेलेली विहीर अखेर गवसली!

मागील जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा बैठकीत विहीर गेली कुठे ? असा प्रश्‍न सदस्य देवमन पवार यांनी उचलला होता.
Well
Wellesakal
Updated on

नंदुरबार : मागील स्थायी समितीच्या सभेत ठाणेपाडा येथील आश्रमशाळेसाठीची विहीर खोदल्याची व त्यावर निधी खर्च झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत निधी आला, खर्च झाला तर मग विहीर आता गेली कुठे ? असा प्रश्‍न उपस्थित करीत विहीर चोरीस गेली का ? असा मुद्दा सभेत गाजला होता. मात्र आजच्या जिल्हा परिषद साधारण सभेत पुन्‍हा तो विषय आला व विहीर गवसल्याचे स्पष्ट झाले. (Latest Marathi News)

ठाणेपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याची सोय व्हावी, यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला निधी दिला होता. मात्र विहीर खोदण्यासाठी पाणी पुरवठा विभागाला जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे बरेच महिने तो निधी पडून होता. मात्र त्यानंतर प्रशासनाने तो निधी शासनाकडे परत पाठविला. मात्र जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या दप्तरी तो निधी विहीर खोदण्यासाठी खर्ची दाखविला गेला होता.

Well
कोटींचे कर्ज देण्याच्या बहाण्याने लोकांना लुटणाऱ्या कंपनी चालकांना अटक

मागील जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा बैठकीत विहीर गेली कुठे ? असा प्रश्‍न सदस्य देवमन पवार यांनी उचलला होता. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी श्री. बाविस्कर साऱ्यांचे टार्गेट ठरले होते. आजच्या बैठकीत काही सदस्यांनी विहीर सापडली का ? उपरोधिक प्रश्‍न विचारला. यावर मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी याबाबत चौकशी करीत तो संबंधित विभागाचा कारकुनची चूक असल्याचे निर्दशनास आणले. व तो निधी शासनाला परत गेल्याचे सांगितले. त्यामुळे अखेर चोरीस गेलेली विहीर गवसल्याने या विषयावर पडदा पडला.

महिनाभरात मुख्याध्यापकांची पदोन्नती

जि. प. च्या सर्वसाधारण सभेत माजी जि. प. उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी मुख्याध्यापकांच्या पदोन्नती का होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला. प्राथमिक शिक्षण विभागाचे श्री. रोकडे यांनी आपल्याकडे २०१९ नंतर ही पदोन्नती झाली नसल्याचे सांगितले. त्यानुसार नाईक यांनी धुळे जिल्हा परिषदेमार्फत एका वर्षात दोन वेळा पदोन्नती होऊ शकतात, तर आपल्याकडे तीन वर्षांत एकदाही पदोन्नती का होऊ शकली नाही? असा प्रतिप्रश्न केला. जि.प.अध्यक्ष सीमा वळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. शिक्षण विभागामार्फत श्री. रोकडे यांनी महिनाभरात मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्या करण्यात येतील असे आश्वासन दिले.

Well
हर घर नव्हे, देवघरात तिरंगा! निपाणीतील बक्कनावर कुटुंबीयांचा उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()