धुळे : शहरात एका पोलिस कर्मचाऱ्यासह जिल्हा कारागृह रक्षकाकडे घरफोडी करत चोरट्यांनी किमती ऐवज लांबविला. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Theft at police house in Dhule Crime News)
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
शहरातील वलवाडी परिसराच्या शहीद भगतसिंग कॉलनीत चोरट्यांनी पोलिसाचे बंद घराचे कुलूप तोडून २० ते २५ हजारांचा ऐवज लंपास केला. त्याशिवाय त्यांनी घरातील फराळावर ताव मारल्याची घटना बुधवारी (ता. १४) मध्यरात्री घडली. निजामपूर (ता. साक्री) पोलिस ठाण्यात कार्यरत अरुण फकिरा पाटील बहिणीकडे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाटातील साहित्य जमिनीवर फेकून चांदीचे शिक्के, कडे, असा अंदाजे २० ते २५ हजारांचा ऐवज लंपास केला. अरुण पाटील सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना घराचे दार अर्धवट उघडे दिसले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी देवपूर पोलिस ठाण्याला माहिती दिली.
पोलिस, ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. याबाबत देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या घटनेत देवपूरमधील प्रभातनगरात चोरट्यांनी कारागृह रक्षकाच्या बंद घरातून ऐवज लांबवला. बुधवारी (ता. १४) दुपारी ही घटना लक्षात आली. या प्रकरणी कारागृह रक्षक रामचंद सोमा रोकडे (रा. प्लॉट क्रमांक १३९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आठ डिसेंबरपासून कुटुंबियांसह कामानिमित्त जळगावला गेले. ही संधी साधत चोरट्यांनी घराच्या बेडरूममधील लोखंडी कपाटातून २८ हजारांची रोकड चोरून नेली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.