Dhule Crime News : देवपूरमधील अनमोलनगरातील चोरीचा वेगाने उलगडा; एलसीबीचा तपास

LCB team and inspector Dattatray Shinde present with the suspects in custody in the Amol Nagar burglary case.
LCB team and inspector Dattatray Shinde present with the suspects in custody in the Amol Nagar burglary case.esakal
Updated on

Dhule Crime News : शहरातील देवपूर भागातील अनमोलनगरातील बांधकाम व्यावसायिकाकडे झालेल्या घरफोडीचा एलसीबीच्या पोलिस पथकाने गतीने छडा लावला. यात दोघा चोरट्यांना अटक करीत त्यांच्याकडून ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

एलसीबीच्या वेगवान तपासाचे पोलिस अधीक्षकांनी कौतुक केले.(theft in Anmol Nagar Deopur was quickly resolved by LCB dhule Crime News )

अनमोलनगरातील बांधकाम व्यावसायिक मिलिंद देसले यांच्याकडे १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान चोरट्यांनी घरफोडी केली. वरच्या मजल्यावरील देवघरातील ९६ हजार किमतीतील चांदीच्या देवाच्या मूर्ती, पितळी गाय-बैल नेले. या प्रकरणी बुधवारी (ता. २२) पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून (एलसीबी) सुरू होता. यादरम्यान एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने शहरातील स्नेहनगरातील खांडल विप्र भवनजवळ सापळा रचला.

त्यात दोघा संशयितांना पाठलाग करीत पकडले. दोघांनी त्यांची नावे साहिल शरीफ बेग (वय १९, रा. पंचशील स्तंभाजवळ, मोगलाई) व रूपम दिनेश सोनवणे (वय २२, रा. नकाणे रोड, आंबेडकरनगर, देवपूर) अशी सांगितली.

LCB team and inspector Dattatray Shinde present with the suspects in custody in the Amol Nagar burglary case.
Dhule Crime News : धुळ्यातील 10 आरोपींना मोक्का; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

चौकशीत त्यांनी अनमोलनगरात घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच घरफोडीतील चोरीचा मुद्देमाल रूपम सोनवणे याच्या घरातून काढून दिला. त्यात ६८ हजार किमतीच्या चांदीच्या देवतांच्या सहा मूर्ती, तीन हजारांची पितळी गाय असा एकूण ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघा चोरट्यांना पुढील तपासासाठी पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजित मोरे, श्याम निकम, हवालदार प्रकाश सोनार, हेमंत बोरसे, संदीप पाटील, योगेश चव्हाण, सुरेश भालेराव, योगेश साळवे, पोलिस नाईक प्रल्हाद वाघ, मायूस सोनवणे, तुषार सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

LCB team and inspector Dattatray Shinde present with the suspects in custody in the Amol Nagar burglary case.
Dhule Crime News :स्क्रॅपचा अवैध व्यवसाय; मुंबई-आग्रा महामार्गावरील 20 दुकानमालकांवर गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.