Dhule News : शिंदखेडा तहसील कार्यालयातून Tracktorची चोरी

Shindkheda: The tractor was stolen by the driver from the Tehsil office premises.
Shindkheda: The tractor was stolen by the driver from the Tehsil office premises.esakal
Updated on

Dhule News : चिमठाणे, ता. २५ वालखेडा (ता. शिंदखेडा) येथील पाझरा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन व अवैध वाहतूक करताना वाळूने भरलेला ट्रॅक्टर भरारी पथकाला रविवारी (ता. २५) पहाटे सव्वाचारच्या सुमारास सापडल्यानंतर पथकाने ट्रॅक्टर शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेला असताना चोरून नेल्याचा गुन्हा वालखेडा येथील ट्रॅक्टरचालकाविरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.

त्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Theft of tractor from Shindkheda tehsil office case has been filed against tractor driver in Walkheda for illegal sand transport Dhule News)

शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांच्या आदेशान्वये व तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पाहाटे दोनच्या सुमारास बेटावद महसूल मंडळ अधिकारी आनंदा बोरसे, तलाठी किशोर बडगुजर, मनोज साळवे, विजय सोनवणे असे खासगी वाहनाने नरडाणा गावाच्या शिवारात पेट्रोलिंग करीत असताना पहाटे सव्वाचारच्या सुमारास वाघाडी गावाच्या पुढे एमआयडीसी रस्त्यावर समोरून एक विनाक्रमांकांचा स्वराज कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॉली फिकट चॉकलेटी रंगाचे एक ब्रास वाळू भरून येत असताना दिसले.

त्यास थांबवून ट्रॅक्टरवरील चालकास वाळू वाहतुकीच्या परवान्याची विचारणा केली असता त्याने वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shindkheda: The tractor was stolen by the driver from the Tehsil office premises.
Dhule News : सोनगीरच्या सरपंच ठाकरे अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने तुळशीराम ऊर्फ गब्बर आत्माराम कोळी-येळवे (रा. वालखेडा) व मालकाचे नाव लक्ष्मण पांडुरंग येळवे असे सांगितले. ट्रॅक्टर ताब्यात घेऊन भरारी पथकाने शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टर लावण्यात आला व चावी काढून जवळ ठेवली.

त्याच वेळी दुसऱ्या एक ट्रॅक्टरची बातमी मिळाल्याने सर्वजण होळ गावी निघून गेले. नंतर होळ येथील ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात घेऊन आले असता पहिला पकडलेला ट्रॅक्टर दिसला नाही म्हणून खात्री झाली.

ट्रॅक्टरवरील चालक तुळशीराम कोळी चोरी करून घेऊन गेला. ट्रॅक्टरची किंमत पाच लाख व एक ब्रास वाळूची किंमत चार हजार रुपये असा एकूण पाच लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन गेला आहे. याबाबत बेटावद महसूल मंडळ अधिकारी आनंदा भीमराव बोरसे (वय ५४) यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून चालक तुळशीराम कोळी याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एकलाख पठाण तपास करीत आहेत.

Shindkheda: The tractor was stolen by the driver from the Tehsil office premises.
Dhule News : आता बिनशेतीसाठी फिरफिर थांबणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()