Dhule ZP School : राज्यात समग्र शिक्षा अभियानातून विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. गुणवत्तावाढीसाठी विविधांगी प्रयत्न होत आहेत. आता राज्यातील हजारावर शाळांचे एकत्रीकरण होणार आहे. एकाच आवारातील दोन शाळांची एकच शाळा होणार आहे.
धुळे जिल्ह्यातील ५२ शाळा एकत्रीकरणाचे प्रस्ताव सादर होणार आहेत. म्हणजे २६ शाळा कमी होऊन २६ शाळा अस्तित्वात येतील.
या अनोख्या गुणवत्ता सुधार प्रकल्पाचे काहींकडून स्वागत, तर काहींकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. (There will be only one school of all 52 school united dhule zp school news)
गुणवत्तावाढ अन् शाळा एकत्र
राज्यात समग्र शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. गुणवत्ता सुधार प्रकल्पाचाही समावेश आहे. यामुळे विविधतापूर्ण निर्णयांची अंमलबजावणी होत आहे. एकाच आवारातील दोन शाळांमध्येही जी शाळा गुणवत्तेत पुढे आहे अशा शाळेत दुसऱ्या शाळेचे समावेशन होणार आहे. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे शैक्षणिक जाणकारांकडून चर्चिले जात आहे.
...या गावांतील शाळांचे एकत्रीकरण
एकाच आवारातील दोन शाळांचे एकत्रीकरण होत आहे. निजामपूर येथील दोन मराठी व एक ऊर्दू, पिंपळनेर येथील चार मराठी शाळा, नरडाणा येथील तीन शाळांचा समावेश आहे. पुढील गावांतील दोन शाळांची एकच शाळा होत आहे. कापडणे, अवधान, नेर, लामकानी, चिंचवार, सोनगीर, मोहाडी प्र. डांगरी, शिरूड, म्हसदी, कासारे, निजामपूर (तीन शाळा), जैताणे, दुसाणे, छडवेल, दहिवेल, पिंपळनेर (चार शाळा), सामोडे, मालपूर, नरडाणे (तीन शाळा), वारूड, म्हळसर, नाथे, होळनांथे व वडोदे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
26 मुख्याध्यापक अतिरिक्त
या एकत्रीकरणामुळे जिल्ह्यातील २६ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरतील. त्यांचे समावेशन एकत्रीकरणाची शाळा वगळता इतर शाळांमध्ये होईल, तर ज्या शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी आहे तेथील विद्यार्थ्यांना हमखास वर्गशिक्षक मिळणार आहे.
दरम्यान, या एकत्रीकरणाविषयी शिक्षकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. थोड्या शिक्षकांचा विरोध तर बहुतांश शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हजारावर शाळा होतील कमी..!
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्यातून शाळांचे प्रस्ताव दाखल करण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहेत. हजारावर शाळा कमी होणार आहेत. शिक्षकसंख्येसह मुख्याध्यापकपदेही कमी होणार असल्याचे जाणकारांमधून चर्चिले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.