Board Exam : यंदा दहावी, बारावीची परिक्षा कडक; कॉपीमुक्त अभियान

SSC HSC Board exam
SSC HSC Board exam Sakal
Updated on

धुळे : युवा पिढी गुणवत्तापूर्ण घडावी, या माध्यमातून देशाचे भवितव्य आणखी उज्ज्वल व्हावे यासाठी यंदा राज्यासह जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानांतर्गत दहावी, बारावीची परिक्षा ‘कडक’ होणार आहे. (This year 10th 12th exams will be made tougher under copyfree campaign in state district dhule news)

शहरासह जिल्ह्यातील कुठल्या भागात कुठले पथक केव्हा परिक्षा केंद्राची तपासणी करेल आणि विद्यार्थ्यांची अंगझडती घेईल यापासून परिक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिक्षकांच्या ‘ड्युटी’बाबत परिक्षा सुरू होण्याच्या काही वेळ अगोदरपर्यंत गोपनीयता राखली जाईल, असे सांगत परिक्षा केंद्र आणि विद्यार्थ्यांनी भविष्य खराब होईल, असे काहीही प्रकार करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

राज्य शासनातर्फे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, विविध विभागांच्या प्रधान सचिवांनी शुक्रवारी (ता. १०) सकाळी दीर्घ काळ व्हीडीओ कॉन्फरन्स घेतली. तीत सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सीईओ, पोलिस अधीक्षक, शिक्षणाधिकारी, मनपा आयुक्त आदी प्रमुख अधिकारी सहभागी झाले.

त्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रभावीपणे कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हास्तरावर देण्यात आले. यासंदर्भात जिल्हाधिकारी शर्मा, सीईओ बुवनेश्‍वरी एस., अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करण्याचे आवाहन करत शुभेच्छाही दिल्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

SSC HSC Board exam
Sharad Pawar on Atul Save: राज्याचे मंत्री केंद्राच्या विसंगत धोरण मांडतात; पवारांचा सहकार मंत्री सावेंवर निशाणा

विशेष पथकांची नियुक्ती

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाल्या नाहीत. शाळास्तरावर परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे या वर्षी परीक्षेत कॉपी करण्याचे व कॉपी पुरवण्याचे गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व विभागांकडून एकत्रितपणे प्रयत्न केले जाणार आहेत.

यास पालक, विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य करावे. येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या बारावी व त्यानंतरच्या दहावीच्या परिक्षेवेळी जिल्ह्यात कॉपीमुक्त परिक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली जाईल.

जीपीएस लोकेशन घेणार

कॉपीमुक्त अभियान राबविताना परीक्षा केंद्राचे अतिसंवेदनशील, संवेदनशील व सर्वसाधारण, अशी वर्गवारी करण्यात येणार असून कॉपीचे प्रकार होणाऱ्या परिक्षा केंद्रावर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक परिक्षा केंद्रावर बैठे पथक तसेच, भरारी पथकही नियुक्त केले जाणार आहेत.

SSC HSC Board exam
Dhule Crime News : चोरट्यांची अभियंत्याच्या घरात पार्टी!

शिवाय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक हेही परिक्षा काळात विविध परिक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. प्रसंगी विद्यार्थ्यांची झडतीही घेतली जाणार आहे. गोपनीयतेने परिक्षा साहित्य घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे जीपीएस लोकेशन घेतले जाणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर पाच किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी कॉपी करताना सापडतील, त्या परीक्षा केंद्राच्या केंद्रसंचालकांवर कारवाई करण्यात येईल.

हेल्पलाइनसह नियम

जिल्ह्यात गैरप्रकार झाल्यास त्याची माहिती देण्यासाठी हेल्पलाइन नंबर दिला जाणार आहेत. त्याबाबत तक्रारीची दखल घेऊन तत्काळ त्या ठिकाणी पोलिस व इतर पथक पोचणार आहेत. परीक्षा केंद्रावर ५० मीटरच्या आत कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेशास बंदी राहणार आहे.

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४५ परीक्षा केंद्रावर २३ हजार ८७९, तर दहावीच्या परीक्षेसाठी २८ हजार १९९ विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याचे शिक्षणाधिकारी देसले यांनी सांगितले. परीक्षेसाठी अद्यापही दहा दिवसांचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. जेणेकरून

त्यांना कॉपी करण्याची आवश्यकता भासणार नाही असे सांगत जिल्हा प्रशासनाच्या या अभियानात विद्यार्थी, पालक, शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले

SSC HSC Board exam
Girish Mahajan | राज्यात लवकरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था शिवसेनेसारखी होईल : गिरीश महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.