Navratri 2023 : शारदीय नवरात्रोत्सवात खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ‘उदे गं अंबे उदे’च्या गजराने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघत आहे. नवरात्रीच्या या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे.
राज्यातील पाचवे शक्तिपीठ असलेल्या श्री एकवीरा देवी मंदिरात रविवारी (ता. २२) अष्टमीला होमहवन झाले. त्यानिमित्त हजारो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक झाले.(Thousands of devotees at Ekvira Devi temple on Ashtami dhule navratri news)
शहरातील पांझरा नदीकाठावर खानदेश कुलस्वामिनी आदिशक्ती एकवीरा मातेचे मंदिर आहे. या मंदिराला सुमारे ४०० वर्षांचा इतिहास आहे. २५० कुळांची कुलस्वामिनी असलेल्या श्री एकवीरा देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सतत भक्तांची मांदियाळी असते. नवरात्रोत्सवाला सुरवात झाल्यापासून मंदिरात भाविकांची रीघ लागली आहे.
रविवारी (ता. २२) अष्टमी, होमहवन असल्याने संपूर्ण खानदेश, महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश राज्यांतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यात महिलांची संख्या अधिक होती. नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील भाविक पहाटे चारपासूनच पायी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.
यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात पूजा साहित्यांसह विविध खेळणी, खाद्यपदार्थ विक्रेते, संसारोपयोगी साहित्य विक्रेते, शीतपेय विक्रेते, पाळणे आदी व्यावसायिक राज्यभरातून दाखल झाले आहेत. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.
या यात्रोत्सवासाठी मंदिर ट्रस्टचे मुख्य विशस्त सोमनाथ गुरव, उपाध्यक्ष मनोहर गुरव, सचिव नंदलाल सोनवणे, सहसचिव महेश गुरव, ट्रस्टी सदाशिव पुजारी, पंकज गुरव, संजय गुरव, सुनील गुरव, चंद्रशेखर गुरव, गजानन सूर्यवंशी, विशाल पुजारी परिश्रम घेत आहेत.
मंदिरात विविध कार्यक्रम
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. २४ ऑक्टोबरपर्यंत रोज सकाळी साडेनऊला पंचामृत महापूजा सप्तश्री पाठ, सोमवारी (ता. २३) सकाळी दहाला महानवमीनिमित्त सुवासिनी पूजन होईल.
२४ ऑक्टोबरला दसरा उत्सव कालावधीत मंदिर परिसरात विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम होतील, अशी माहिती मुख्य विशस्त गुरव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.