Dhule Crime News : एलसीबीच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधानजवळ सापळा रचत गांजाची तस्करी रोखली. कारमधून गांजा घेऊन जाणाऱ्या नगरच्या वृद्धाला जेरबंद केले. कारसह गांजा असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
स्विफ्ट कारमधून गांजाची अवैधपणे वाहतूक होत आहे. (Three and half lakh worth of ganja seized from LCB dhule crime news)
वाहन मुंबई-आग्रा महामार्गावरून धुळ्याकडून मालेगावकडे जात असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यांनी पथकाला वाहनाबाबत खात्री करून कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार बुधवारी (ता. १) रात्री पावणेनऊच्या सुमारास पथकाने सापळा लावला.
मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवधान (ता. धुळे) गावाजवळ धुळ्याकडून मालेगावकडे जाणाऱ्या संशयित कार (एमएच १४, डीझेड ८०५५)ला अडविले. चालकास नाव विचारले असता त्याने मेहबूब खान उसमान खान (वय ६२, रा. १२, इमाम कोटला घास गल्ली, नगर) असे सांगितले. कारची तपासणी केली असता त्यात गांजा मिळून आला. ५१ हजार ५० हजारांचा १० किलो २१० ग्रॅम गांजा व तीन लाखांची स्विफ्ट कार, असा तीन लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी कमलेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार मेहबूब खान उसमान खान याच्याविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, योगेश राऊत, अमरजित मोरे, श्याम निकम, संदीप पाटील, प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी, मायूस सोनवणे, चेतन बोरसे, कमलेश सूर्यवंशी, सागर शिर्के, योगेश साळवे, गुलाब पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.