Dhule News : जिल्ह्यात आरटीईअंतर्गत १०५ खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत चार हजार ७१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते.
या प्रतिपूर्ती अनुदानाची मोठी रक्कम थकीत आहे. (Three crore reimbursement grants to schools are pending dhule news)
२०२२-२३ चे अनुदान वितरित करण्यासाठी शासनाकडून चार कोटी ४१ हजार ८६ रुपये निधी शिक्षण विभागाला मिळाला. मात्र त्यानंतरही दोन कोटी ८१ लाख १२ हजार ८८३ रुपये निधी येणे बाकी आहे.
आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव असतात.
संबंधित शाळेने राखीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर या विद्यार्थ्यांचे शासकीय दरानुसार शुल्क शासन देते. एका विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी १७ हजार ६७० रुपये प्रतिपूर्ती शुल्क शाळांना मिळते.
खासगी शाळांचे शुल्क कितीही असले, तरीही शासनाकडून ठरवून दिलेल्या दरानुसार प्रतिपूर्ती रक्कम अदा केली जाते. दरम्यान, बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून मिळत नसल्याची खासगी विनाअनुदानित शाळांची तक्रार आहे.
धुळे जिल्ह्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आरटीई प्रतिपूर्तीसाठीची कोट्यवधींची रक्कम शासनाकडे थकीत आहे.
ती वेळेवर मिळत नसल्याने खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. आरटीई प्रवेशांनुसार प्रतिपूर्तीसाठी थकीत असलेले अनुदान मिळावे, यासाठी शाळांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
मात्र, शासनाकडून निधी येत नसल्याने थकीत रकमेचा आकडा दर वर्षी वाढत आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षात आरटीई प्रवेशांच्या प्रतिपूर्तीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाकडे सात कोटी २० लाख १२ हजार ९६९ रुपयांची मागणी केली.
मात्र, यापैकी चार कोटी ४१ लाख ८६ रुपयांचा निधी शासनाने शिक्षण विभागाला दिला. उपलब्ध झालेला निधी जिल्ह्यातील १०५ इंग्रजी माध्यमाच्या शाळांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तालुकानिहाय शाळा व विद्यार्थी
-धुळे मनपा क्षेत्र...११...८७६
-धुळे तालुका......२४...९६३
-साक्री.............२९...८४४
-शिरपूर.............१६...६९२
-शिंदखेडा.........२५...१३४४
-एकूण...........१०५...४७१९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.