पिंपळनेर (जि. धुळे) : आमळी (ता. साक्री) येथील अलालदरी पर्यटन क्षेत्र विकासासाठी तीन कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. (Three half crore funds approved for Alaldari Information of MLA Manjula Gavit Dhule News)
साक्री विधानसभा मतदार क्षेत्रातील आमळी येथे अलालदरी या पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांना मूलभूत सोयी-सुविधा निर्माण करून पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून विविध विकासकामे करण्यासाठी तीन कोटी ५० लाख रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाल्याची माहिती आमदार मंजुळा गावित यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
साक्री तालुक्यातील अलालदरी, चिवटीबारी, वखारदरा, मोहगाव या पर्यटनस्थळांचा विकास व्हावा म्हणून मे २०२१ मध्ये धुळे येथे मुख्य वनसंरक्षक व त्यांचे सहकारी यांच्यासमवेत पर्यटन क्षेत्राच्या विकासाचा कृती आराखडा तयार करावा म्हणून बैठक झाली.
त्यानंतर हा प्रस्ताव तत्कालीन पर्यटनमंत्र्यांकडे पाठविण्यात आला. साक्री तालुक्यातील आमळी येथे अतिप्राचीन असलेले श्री कन्हय्यालाल महाराज यांच्या कार्तिक महिन्यात भरण्यात येणाऱ्या यात्रेत लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार
भाविकांच्या सोयीसाठी पर्यटनस्थळाचा विकास व्हावा यासाठी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा हा निधी मंजूर करून घेतला. यापूर्वीदेखील श्री कन्हय्यालाल महाराज मंदिर परिसरात भक्त निवास बांधण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून, भक्त निवासाचे काम प्रगतीत आहे.
विकासकामांचा कृती आराखडा करण्यासाठी पर्यटन संचालनालयाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत लवकरच बैठकीचे आयोजन करून कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार मंजुळा गावित व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांनी प्रसिद्धीस दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.