Dhule Crime News : श्री शिवमहापुराण कथास्थळी हातसफाई करणारे तिघे ताब्यात

LCB action team with the thieves in custody at Sri Shiva Mahapuran Kathasthala.
LCB action team with the thieves in custody at Sri Shiva Mahapuran Kathasthala.esakal
Updated on

Dhule Crime News : श्री शिवमहापुराण कथेसाठी येथे आलेल्या भाविकांना गंडा घालणाऱ्या टोळीला एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने गजाआड केले.

भाविकांच्या गळ्यातील माळ, पाकिटे व मोबाईल चोरीतून हातसफाई करणाऱ्या चोरट्यांना ‘एलसीबी’ने दणका दिला असून, भाविकांनी आपापला किमती ऐवज सांभाळावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले.(Three thieves arrested at Shiv Mahapuran katha dhule crime news)

शहरातील सुरत बायपासवरील हिरे मेडिकललगत पंडित प्रदीप मिश्रा श्री शिवमहापुराण कथेचे निरूपण करीत आहेत. कथास्थळी लाखो भाविक श्रवणासाठी उपस्थित असतात.

तेथे गर्दीचा फायदा घेत चोरटे भाविकांच्या गळ्यातील सोन्याची माळ व पाकीटमारी करतील, अशी शक्यता लक्षात घेत या स्थितीवर नियंत्रणासाठी पोलिस अधिक्षक बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी एलसीबीला योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार या पथकाने साध्या वेशातून संशयितांचा शोध सुरू ठेवला.

LCB action team with the thieves in custody at Sri Shiva Mahapuran Kathasthala.
Dhule Crime News : 5 लाखांचा गंडा; दोघांविरुद्ध गुन्हा

गर्दीत हातसफाई करणारे तीन चोरटे एलसीबी पथकाच्या हाती लागले. चौकशीत ते तिघे धुळे, मालेगाव व भुसावळ येथील असल्याचे आढळले. त्यामुळे बाहेरगावहून चोरटे धुळ्यात आल्याची खात्री पटली.

चोरट्यांकडून पाकीटे हस्तगत केली असून त्यांच्या इतर साथीदारांचीही माहिती घेतली जात आहे. मोबाईल हस्तगत करण्यात येत आहेत. वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या संशयितांचाही शोध सुरू आहे. नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन आहे.

LCB action team with the thieves in custody at Sri Shiva Mahapuran Kathasthala.
Dhule Crime News : गावात घरफोडीत 9 लाखांचा ऐवज लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.