Nandurbar Chetak Festival: टॉलिवूडला ‘चेतक फेस्टिव्हल’ची भुरळ! चित्रपट निर्मात्याने खरेदी केले 20 अश्व

सारंगखेडा (ता. शहादा) येथील अश्व बाजाराला राजेराजवाड्यांपासून परंपरा लाभली आहे.
While buying a horse, the producer of 'Tollywood' K. S. Ravikumar. Neighbor Jaipal Singh Rawal.
While buying a horse, the producer of 'Tollywood' K. S. Ravikumar. Neighbor Jaipal Singh Rawal.esakal
Updated on

शहादा : इतिहासात नोंद असलेल्या येथील येथे श्री एकमुखी दत्त यात्रेनिमित्त भरणाऱ्या अश्व बाजाराला बॉलिवूड, हॉलिवूड या क्षेत्रातील कलाकारांना भुरळ घातली होती, त्यात आणखी भर पडली आहे, ती ‘टॉलिवूड’ची... आतापर्यंत अनेक चित्रपट निर्मात्यांनी येथून अश्व खरेदी केले.

या वर्षीही दक्षिणेच्या चित्रपट निर्मात्याने तब्बल २० अश्वांची येथील बाजारातून खरेदी केली. (Tollywood fascinated by Nandurbar Chetak Festival filmmaker bought 20 horses)

सारंगखेडा (ता. शहादा) येथील अश्व बाजाराला राजेराजवाड्यांपासून परंपरा लाभली आहे. भल्याभल्यांना येथील अश्व बाजाराने भुरळ घातली आहे.

उमदे व देखणे घोडे येथील अश्व बाजाराचे वैशिष्ट्य आहे. देशात अनेक ठिकाणी अश्वबाजार भरतो. परंतु सर्वाधिक उलाढाल येथील बाजारात होते. देशातील ख्यातनाम व्यक्तींनी येथूनच घोडे खरेदी केले आहेत.

के. एस. रविकुमार यांच्याकडून खरेदी

तमीळ चित्रपट वल्लीवल, इंडूकेमल, ली, सलामत बादशहा या चित्रपटांसाठी सुमारे एक ते दोन लाख दरम्यानचा किमतीचे २० घोडे खरेदी केले. गेल्या वर्षीही याच अश्व बाजारातून तमीळ चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सुमारे ४० घोडे खरेदी केले होते.

‘टॉलिवूड’चे निर्माते के. एस. रविकुमार यांनी ‘मूत्तू’ या चित्रपटासाठी सारंगखेडा अश्व बाजारातून २० घोडे खरेदी केले होते. या चित्रपटात रजनिकांत यांची भूमिका होती. डी कल्लूतूरा, डी. रेड्डी, एम. सल्लूजी यांनीही हजेरी लावली.

While buying a horse, the producer of 'Tollywood' K. S. Ravikumar. Neighbor Jaipal Singh Rawal.
Ayodhya Ram Mandir: रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेत नाशिकला महत्त्वाचे स्थान! राज्यातील 360 जणांच्या यादीत 29 जण

सातासमुद्रापार झेंडा...

येथील यात्रेची ख्याती आता सातासमुद्रापार पोचली आहे. देशभरातील नागरिकांसह विदेशातील नागरिकांनामध्येही येथील यात्रेची गोडी निर्माण झाली आहे. फेसबुक, यू-ट्यूब, ट्विटरवर अनेक नागरिक यात्रा पाहतात.

काही विदेशी नागरिकांना मात्र मोह आवरता येत नसल्याने ते प्रत्यक्ष यात्रेला भेट देत असतात. यात्रेला अजून ख्याती प्राप्त होण्यासाठी शासनाकडून मदत होणे मात्र क्रमप्राप्त ठरते.

"उमदे घोडे खरेदीसाठी विविध प्रांतातील नागरिक येथे येतात. यात्रेचे महत्त्व अबाधित राहावे, नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. घोडे विक्रीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांशी नियमित संपर्क साधला जातो. परप्रांतातील नागरिक घोडे खरेदीसाठी आल्यानंतर त्यांना आवश्यक ती मदत निश्चितच केली जाते."

- जयपालसिंह रावल, अध्यक्ष, चेतक फेस्टिव्हल, सारंगखेडा

While buying a horse, the producer of 'Tollywood' K. S. Ravikumar. Neighbor Jaipal Singh Rawal.
Nashik News: ‘एसटी’च्या चालक-वाहकांना RTOमध्ये प्रतिनियुक्ती! सध्या कार्यरत जिल्ह्यातच संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.