Dhule Tomato Rate : द्विशतक ठोकणारा टोमॅटो 10 रुपये किलो; दरात घसरण

tomato
tomatoesakal
Updated on

Dhule Tomato Rate : उन्हाळी हंगाम जून-जुलैला संपलेला, पावसाने घेतलेली ओढ, सद्यःस्थितीत उन्हाळ्यासारख्या दिवसाचे परिणाम, शिवाय लग्नसराई नाही आणि हंगाम नोव्हेंबर-डिसेंबरपासून असताना मागणी नसूनही चांगला दर मिळण्याऐवजी टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाली आहे.

ऐक वेळ पावणेदोनशे-दोनशे रुपये किलोदराने विक्री होणारा टोमॅटो सध्या सात, दहा, पंधरा रुपये किलोने विक्री होत आहे. दुष्काळाशी सामना करणाऱ्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांप्रति सहानुभूतीची गरज व्यक्त होताना टोमॅटोला चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा या घटकातून व्यक्त होताना दिसते.

शहरातील भाजी बाजारात चार महिन्यांपूर्वी उसळी घेत दरामध्ये द्विशतक ठोकणारा टोमॅटो सध्या मात्र सरासरी दहा रुपये किलोवर आला आहे. किलोमागे १८० ते २०० रुपये दर मिळणारा टोमॅटो आता सरासरी सात, दहा, पंधरा रुपये प्रतिकिलो दराने विक्री केला जात आहे. (tomato rate fall in dhule news)

त्यामुळे काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमे, सोशल मीडियावर चर्चेत असलेला टोमॅटो दरप्रश्‍नी विविध कारणांमुळे सध्या दुर्लक्षित झाला आहे. असे असताना सर्वसामान्य ग्राहकांना टोमॅटोच्या घसरत्या दरामुळे दिलासा मिळाला आहे, तर याउलट उत्पादक मात्र अपेक्षित दराला मुकत आहे.

आवक वाढल्याने स्वस्त

शहर परिसरातील आणि धुळे तालुक्यातील कापडणे, न्याहळोद, धमाणे, देवभाने, नंदाणे, बुरझड, लामकानी, बोरीस, मुकटी, अजंग, नेर व आनंदखेडे येथील शेतकरी भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहेत. अर्ध्या किंवा एक एकरमधूनही विक्रमी भाजीपाल्याचे उत्पादन काढण्याचे कसब या परिसरातील शेतकरी उत्पादकांनी हस्तगत केले आहे.

तीन ते चार महिन्यांपूर्वी धुळे बाजार समितीत भाजीपाला कवडीमोल जात होता. त्यातच टोमॅटोने प्रती १८० ते २०० रुपये किलोपर्यंत उसळी घेतली होती. टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. मात्र, नंतर परिसरातून मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने दरात अचानक घसरण झाली. त्यामुळे दोनशे रुपयांवर पोहचलेला टोमॅटो आता स्वस्त झाला आहे.

पालेभाज्या दरात घसरण

पालेभाज्याही पाच ते दहा रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. त्याचबरोबर स्वयंपाकघरात रोज वापरण्यात येणारा टोमॅटो स्वस्त झाल्याने खरेदी सर्वसामान्यांना सहज शक्य झाली आहे. यापूर्वी टोमॅटोचा दर १८० ते २०० रुपये प्रती किलोवर पोहोचल्याने गृहिणींचे घरगुती बजेट बिघडले होते.

tomato
Nanadurbar Agriculture News : शेतकरी धास्तावला; पपईवर डाऊनी, मोझॅकचा प्रादुर्भाव

रोजच्या जेवणातील टोमॅटोची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली. परिणामी, अनेकांच्या आहारातून टोमॅटो गायब झाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवस टोमॅटो महागच राहिल्याने ग्राहकांना अधिक रक्कम मोजावी लागली.

मात्र, किरकोळ बाजारात सध्या प्रती किलो टोमॅटोसाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत आहेत, तर चांगल्या दर्जाचा टोमॅटो घेताना २० किंवा ३० रुपये मोजावे लागत आहेत. अनेक दिवसांनंतर टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने खेरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आगामी पंधरा ते वीस दिवसांनी टोमॅटोचे दर आणखी घसरणार असल्याचे मत व्यावसायिकांनी मांडले.

उत्पादक आता दुर्लक्षित

सुरूवातीला शहरातील भाजी बाजारात दहा, वीस रुपये किलोने विक्री होणाऱ्या टोमॅटोच्या दराने चार महिन्यांपूर्वी उसळी घेतली होती. तेव्हा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत केवळ टोमॅटोच्या दराचीच चर्चा होती. त्यातून सोशल मीडिया ढवळून निघाला होता. टोमॅटो घरात असेल तर तो तिजोरीत ठेवा, असेही विनोद होत होते.

आता टोमॅटोचे दर कमी झाले म्हणून मातीमोल किमतीने टोमॅटो विक्री करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांबद्दल कोणी सहानुभूतीची एक ओळ सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसत नाही, उत्पादक आता दुर्लक्षित राहिल्यासारखे आहेत, अशी बोलकी प्रतिक्रिया काही उत्पादकांनी दिली.

tomato
Nashik Tomato Rate Fall : टोमॅटो बाजारभाव दरात घसरण; शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()