Nandurbar Fire News : ट्रॅक्टर शोरूमला आग आणि..... जळत जळत ट्रॅक्टर 10 फूट पुढे!

Tractor showroom fire in Shahada
Tractor showroom fire in Shahada esakal
Updated on

Nandurbar Fire News : शहरातील प्रकाशा बायपास रस्त्यावरील मोलाई राज ट्रॅक्टर या ट्रॅक्टरच्या शोरूमला मंगळवारी (ता. १८) मध्यरात्री भीषण आग लागून त्यात सुमारे सात ट्रॅक्टर व बारा इलेक्ट्रॉनिक बाईक, एक शेवरोलेट कंपनीची बिट कार, तसेच इतर कृषिपूरक साहित्य जळून खाक झाले. आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले. (Tractor showroom fire in Shahada Billions of losses nandurbar news)

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. दरम्यान, रस्त्यावरून जात असलेल्या काही नागरिकांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. घटनास्थळी लागलीच शहादा पालिकेच्या अग्निशमन बंबाने हजेरी लावून नागरिकांच्या मदतीने तब्बल ५५ मिनिटांनी आग आटोक्यात आणली.

शहादा-प्रकाशा रस्त्यावर हॉटेल नंदनवनसमोर जकीउद्दीन हमजा बोहरी (रा. प्रकाशावाले) यांचे मोलाई राज ट्रॅक्टर डीलर्स, इलेक्ट्रॉनिक दुचाकी व शेती अवजारे विक्री साहित्य करणारे शोरूम आहे. मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास शोरूमला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.

समोर हॉटेल परिसरात असलेल्या युवकांच्या व रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांच्या आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर लागलीच मिळेल तिथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी भ्रमणध्वनीवरून अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर तत्काळ शहादा पालिकेचे अग्निशमन बंब हजर झाले. तब्बल ५५ मिनिटांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Tractor showroom fire in Shahada
Dhule Wax Factory Fire : मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडुन 'इतकी' मदत जाहीर

कोट्यवधींच्या नुकसानीचा अंदाज

या अचानक लागलेल्या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीत ट्रॅक्टर शोरूममध्ये असलेल्या प्रत्येकी ७० हजार रुपये किंमत असलेल्या ८ लाख ६४ हजार रुपयांचा १२ दुचाकी, प्रत्येकी सात लाख ५० हजार रुपये किंमत असलेले ३७ लाख ५० हजार रुपयांचे पाच आयशर कंपनीचे ट्रॅक्टर,

नऊ लाख ५० हजार रुपयांचे प्रायमा ट्रॅक्टर, चार लाख ५० हजारांची शेवरोलेट कंपनीची बीट कार, पाच लाख ५० हजार किमतीचे २८० सी.सी.चे एक आयशर लहान ट्रॅक्टर, सात लाख ५० हजारांचे चारा कुट्टी मशिन, प्रत्येकी दीड लाख किमतीचे पाच चारा कुट्टी मशिन, अडीच लाख किमतीचे दोन जनरेटर, तसेच कटर, आर्मीचर, चारा कटर आधी शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यासोबत शोरूमही आगीत भस्मसात झाले.

जळत जळत ट्रॅक्टर दहा फूट पुढे

आगीने रौद्ररूप धारण केल्याने नागरिक आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होती. त्याचदरम्यान वाहनांचे टायरही फुटू लागले अन्‌ मोठा स्फोट होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत होते. याच वेळेस एक ट्रॅक्टर जळता जळता चक्क दहा फूट स्वयंचलित वाहनासारखे पुढे सरकले.

Tractor showroom fire in Shahada
Dhule Wax Factory Fire : होरपळलेल्या 5 महिलांच्या मृत्यूचे गूढ कायम

याच दरम्यान जळते ट्रॅक्टर ज्या ठिकाणी येऊन थांबले तेथील गुदामात चार्जर बॅटऱ्या होत्या. संबंधित ट्रॅक्टरची आग वेळेत आटोक्यात आली नसती तर बॅटरी गुदामामुळे मोठा अनर्थ होण्याची भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.

५५ मिनिटांनंतर आगीवर नियंत्रण

मध्यरात्री लागलेल्या या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलासोबतच प्रत्येक समाजातील माणूस माणुसकी दाखवत पुढे सरसावला. यात लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक, युवक, तरुण, शासकीय कर्मचारी सर्वांनी मिळून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

याच दरम्यान पोलिस कर्मचारी अमोल राठोड यांनी जिवाची पर्वा न करता स्वतः जीव धोक्यात टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे, सहाय्यक निरीक्षक गणेश पवार, पोलिस कर्मचारी दादा बुवा, सचिन कापडे, अमोल राठोड आदींनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

Tractor showroom fire in Shahada
Dhule Candle Factory Fire : 5 बळी प्रकरणी तिघांना अटक; जैताणे- निजामपूरला कडकडीत बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.