Nandurbar Crime News : भागापूर (ता. शहादा) येथून चोरीस गेलेला कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर शहादा पोलिसांनी तपासाची चक्री वेगाने फिरवून आरोपीला १२ तासांच्या आत जेरबंद करून ट्रॅक्टर व मोटारसायकल जप्त केली.
राहुल नरोत्तम पाटील (रा. भागापूर, ता. शहादा) यांनी ५ नोव्हेंबरला आपला कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच ३९, एजे १४३६) घराजवळ अंगणात उभा केलेला होता.(Tractor thief jailed within 12 hours by shahada police nandurbar crime news )
अज्ञात व्यक्तीने रात्रीतून चोरीस नेल्याची फिर्याद शहादा पोलिसांत दाखल केली होती. पोलिस आरोपीच्या शोधात होते. जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ट्रॅक्टर चोरट्यांनी करणपुरा खेतिया (मध्य प्रदेश)जवळ नाल्यात लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्याने त्याच्या शोधाचे आदेश शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गेल्यावर पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी तत्काळ तपासाची चक्री वेगाने फिरविली.
पोलिस उपनिरीक्षक छगन चव्हाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप राजपूत, पोलिस कर्मचारी योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी यांनी मध्य प्रदेशात जाऊन चौकशी केली असता बेहडिया भागात लकी किशोर बिरारे (वय १८, रा. भादे, ता. शहादा), बबलू अशोक सोलंकी (१९, रा. भोकराटा, ता. पाटी, जि. बडवानी, ह.मु. खेड दिगर, ता. शहादा), संकेत वामन डावर (२२, करणपुरा, ता. पानसेमल, मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून सहा लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली. ट्रॅक्टर करणपुरा शिवाराच्या नाल्यात लपवून ठेवलेला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत तसेच पोलिस उपनिरीक्षक छगन चव्हाण, प्रदीप राजपूत तपास करीत आहेत.
विशेष म्हणजे बारा तासांच्या आत चोरट्यांना जेरबंद केल्याने पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.