Dhule News : सोनगीरच्या बोकड बाजारात गर्दी; बाजारात पोचण्यापूर्वीच रस्त्यावरच खरेदी-विक्री

Traders flocked to buy goat sheep in weekly market dhule news
Traders flocked to buy goat sheep in weekly market dhule newsesakal
Updated on

सोनगीर (जि. धुळे) : चैत्रात देवींना बोकडाचा नवस देण्याची खानदेशात परंपरा असल्याने येथील आठवडेबाजारात बोकड खरेदीसाठी व्यापाऱ्यांची गर्दी झाली. (Traders flocked to buy goat sheep in weekly market dhule news)

कोंबडी, बोकड विक्रेते बाजारात पोचण्यापूर्वीच रस्त्यावरच ते घेण्यासाठी व्यापारी तुटून पडत होते. दरम्यान, गेल्या दीड वर्षापासून बोकड बाजारात मंदीची लाट होती. गुरुवारी (ता. २३) बोकड विक्रेत्यांची संख्या वाढली होती.

येथील गुरुवारी भरणाऱ्या आठवडेबाजारात संसारोपयोगी वस्तू, धान्य, खाद्यपदार्थ, मसाल्याचे पदार्थ, भाजीपाला, सौंदर्यप्रसाधने आदी विक्रीस उपलब्ध असतात. तेथे मात्र फारसा उत्साह दिसून येत नसून उलाढाल ३० टक्क्यांनी कमी झाली आहे.

बोकड बाजाराला विशेष महत्त्व असून, सकाळी अकरापर्यंत बाजार भरतो. परिसरातील शेतकरी विक्रेते असतात. सर्व बोकड, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या त्या वेळेपर्यंत विकल्या जातात. धुळे, नंदुरबार, शिरपूर, शहादा, अमळनेर, दोंडाईचा आदी ठिकाणचे व्यापारी खरेदीसाठी येतात. दरम्यान, नवरात्रामुळे बोकड बाजारातील उलाढालीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Traders flocked to buy goat sheep in weekly market dhule news
Dhule Politics News : सत्ताधाऱ्यांचा संताप; मनपाचे ‘गल्ली ते मुंबई’ धिंडवडे जिव्हारी!

रस्त्यावर खरेदी-विक्री

गावात येण्यासाठी पाच प्रमुख रस्ते आहेत. बाहेरगावाहून विक्रेते या मार्गांनी येतात. गुरुवारी सकाळी गावाच्या सीमेवरच व्यापारी विक्रेत्यांची वाट पाहत थांबले होते. विक्रेत्यांना बाजारातही पोचू दिले जात नव्हते. रस्त्यावरच मोठी उलाढाल झाली.

विशेषतः बसस्थानकावर असे प्रकार अधिक घडले. दरम्यान, बाजारात अधिक व्यापाऱ्यांमुळे स्पर्धा होऊन दर वाढतात. तसेच विक्रीबद्दलचा कर व्यापाऱ्यांनाच द्यावा लागतो. म्हणून बाजाराबाहेरच व्यवहार करण्याचे वारंवार प्रयत्न होतात. विक्रेत्या शेतकऱ्याला अनेक व्यापारी एकत्र येऊन योग्य भाव मिळू देत नाहीत म्हणून त्यांचे नुकसान होते. याला आळा घालण्याची आवश्यकता आहे.

Traders flocked to buy goat sheep in weekly market dhule news
Dhule News : मेंढ्या दगावल्याची नुकसानभरपाई द्या; विधिमंडळात मेंढपाळांच्या मदतीसाठी उठविला आवाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.