Dhule Marathon 2024 : शहरात रविवारी (ता. ४) `रन फॉर पांझरा`अंतर्गत धुळे मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. ती यशस्वी होण्यासह स्पर्धकांच्या सुविधेसाठी मॅरेथॉन मार्गावरील वाहतूक दुचाकी वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पहाटे पाच ते सकाळी नऊपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद असेल.
सरकारी वाहने व आपत्कालीन विभागाच्या वाहनांना गरजेनुसार प्रवेश असेल. धुळे शहरवासीयांनी उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले. (Traffic stop on Dhule Marathon route news)
स्पर्धेत विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत. ही मॅरेथॉन स्पर्धा पहाटे पाचला पोलिस कवायत मैदानातून सुरू होऊन बारापत्थर चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून जुना आग्रा रोड.
तेथून मोठा पूलमार्गे दत्तमंदिर चौक, जिल्हा क्रीडासंकुल, गोंदूर रोड, गोंदूर गाव येथून त्याच मार्गाने मैदानावर समारोप करेल. स्पर्धेवेळी मॅरेथॉन मार्गावर मोठी वाहने आल्यास स्पर्धेत अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने वाहतुकीचे मार्ग हे दुचाकी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी मॅरेथॉनच्या दिवशी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार आहेत.
तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग
फाशीपुलाकडून पोलिस मुख्यालयाकडे येणारा रस्ता, स्टेशन रोड येथे महात्मा फुले पुतळ्याकडे येणारा रस्ता, बसस्थानक टॅक्सी कॅबीन स्टॅन्डसमोरील रस्ता, मामलेदार कचेरी येथे बारापत्थर, पाचकंदीलकडे येणारा रस्ता.
लोकमान्य हॉस्पिटल येथे चाळीसगाव रोडकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे येणारा रस्ता, अग्रसेन पुतळा येथे मालेगाव रोडकडून येणारा रस्ता, नगावबारी येथे दत्तमंदिराकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे.
गिंदोडिया हायस्कूल चौकाकडून पारोळा रोड कराचीवाला खुंटकडे येणाऱ्या वाहतुकीचा मार्ग, जुनी महापालिका इमारतीकडून कराचीवाला खुंटाकडे वाहतुकीचा मार्ग, आग्रा रोड, दत्तमंदिर चौकाकडे येणारा वाहतुकीचा मार्ग.
गांधी पुतळ्याकडून येणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे. पंचवटी कॉर्नरकडे शहरातून येणाऱ्या वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात येत आहे. वलवाडी टी पॉइंटकडून स्टेडियमकडे येणाऱ्या वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात येत आहे. गोंदूर गावापुढे अर्ध मॅरेथॉनचे टर्न पॉइंट येथून वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात येत आहे.
तीनचाकी, चारचाकी सोनगीरकडून येणारी वाहने पारोळा रोडमार्गे शहरात, तेथून ८० फुटी रोडने रेल्वे स्टेशनमार्गे फाशीपूल, संतोषीमाता चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे बस स्थानक व परत त्याचमार्गे परत जातील.
तसेच चाळीसगावकडून येणारी वाहने लोकमान्य चौकातून रेल्वेस्टेशनमार्गे फाशीपूल, संतोषीमाता चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्ग बसस्थानक व परत त्याचमार्गे परत जातील.
नाशिककडून येणारी वाहने ही रेल्वेस्टेशन मार्गे फाशीपूल, संतोषीमाता चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे बसस्थानक व परत त्याच मार्गे परत जातील.
पोलिसांकडून पार्किंगची व्यवस्था
मॅरेथानसाठी येणाऱ्या स्पर्धकांची वाहने ही बसस्थानकाची मोकळी जागा श्री हनुमान मंदिरासमोर, महात्मा जोतिबा फुले पुतळा जुनी पोलिस लाइनमध्ये, रेस्ट हाउस २ जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या बंगल्याजवळ.
पोलिस मुख्यालय वायरलेस ऑफिस चौक, पोलिस मुख्यालय मेससमोरील परिसरात पार्किंग करावीत, असे आवाहन पोलिस अधीक्षक धिवरे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.