Nandurbar Accident News: नवापूरजवळ अपघातात चालकाचा मृत्यू

पाइपाच्या ट्रालामधून चालकाला काढताना नागरिक, दुसऱ्या छायाचित्रात महामार्गावर रायंगण गावाजवळ झालेला अपघात पाहण्याच्या नादात ट्रकने
फरफटत नेलेली कार.
पाइपाच्या ट्रालामधून चालकाला काढताना नागरिक, दुसऱ्या छायाचित्रात महामार्गावर रायंगण गावाजवळ झालेला अपघात पाहण्याच्या नादात ट्रकने फरफटत नेलेली कार.esakal
Updated on

नवापूर : धुळ्याकडून सुरतला लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्राला (जीजे १० टीएक्स १६८५) महामार्गावरील सावरट व रायंगण गावादरम्यान अपघात होऊन त्याचे दोन तुकडे पडले. रविवारी (ता.२) संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. ट्रालाचालकाचा जागीच मृत्यू झाला. याच ठिकाणी जळगावहून सुरतकडे जाणारे कारचालक व ट्रकचालक अपघात पाहण्यासाठी थांबले असताना त्याच्याही ट्रक व कारचा अपघात झाला.(trala driver dies in accident near Navapur nandurbar latest news)

ट्राला अनियंत्रित झाल्याने महामार्गावरील सिमेंटच्या डिव्हायडरला जोरदार धडक बसली. यामुळे ट्रालामागे असलेले लोखंडाचे पाईप केबिन तोडून बाहेर आले. या पाइपात चालक दाबला गेला. तो बाहेर निघण्यासाठी तळमळत होता, परंतु वजनदार पाईप उचलण्यासाठी पुरेसे साधन वेळेवर उपलब्ध नसल्याने थोड्या वेळातच चालकाचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर जेसीपी आणि क्रेनच्या साहाय्याने पाईप बाजूला करीत चालकाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. घटनेची माहिती मिळताच नवापूरचे साहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील घटनास्थळी दाखल झाले. चालकाचा मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.

ट्रालामधील कागदपत्रावरून त्याची ओळख पटली असून सुनीलकुमार विमल पासवान (४७, रा. भिलाई, जि. दुर्ग, छत्तीसगड) असे त्याचे नाव आहे. चालकाला बाहेर काढण्यासाठी प्रतीक वळवी, युसुफ वळवीसह सावरट व रायंगण गावातील ग्रामस्थांनी मदत केली. या अपघातात ट्रालाचा चक्काचूर झाला आहे.

पाइपाच्या ट्रालामधून चालकाला काढताना नागरिक, दुसऱ्या छायाचित्रात महामार्गावर रायंगण गावाजवळ झालेला अपघात पाहण्याच्या नादात ट्रकने
फरफटत नेलेली कार.
Nashik Increasing Crime : पोलीस सुस्तावल्याने शहरात गुंडागर्दीत वाढ!

अपघात पाहण्याच्या नादात अपघात
सारवटजवळ ट्रालाचा भीषण अपघात झाला, या ठिकाणी चालकाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना महामार्गापलीकडे जळगावहून सुरतेकडे जाणाऱ्या कार व ट्रकचा चालक अपघात बघत असताना ट्रक व कारचा अपघात झाला. ट्रक चालकाने कारला जोरदार धडक देत कारला काही अंतरापर्यंत फरपटत नेले. कारमध्ये दोन प्रवाशी होते.

सुदैवाने त्यांना कुठलीही गंभीर दुखापत झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील समाधान पाटील व त्यांचा एक मित्र या अपघातात सुदैवाने बचावले. नवापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रक आणि कारला बाजूला करत वाहतूक सुरळीत केले.

पाइपाच्या ट्रालामधून चालकाला काढताना नागरिक, दुसऱ्या छायाचित्रात महामार्गावर रायंगण गावाजवळ झालेला अपघात पाहण्याच्या नादात ट्रकने
फरफटत नेलेली कार.
Dasara 2022 : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलबाजार तेजीत; झेंडू शंभरी गाठणार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.