Dhule Municipality News : मागण्यांसाठी बदली सफाई कामगारांची महासभेत एन्ट्री

transfers sweepers of Municipal Corporation entered General Assembly for demand dhule news
transfers sweepers of Municipal Corporation entered General Assembly for demand dhule newsesakal
Updated on

Dhule Municipality News : महापालिकेच्या कायम सेवेत सामावून घ्या, या मागणीसाठी महापालिकेतील बदली सफाई कामगारांनी सोमवारी (ता. १२) थेट महासभेत एन्ट्री केली.

यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, काही नगरसेवक, अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर कर्मचारी सभागृहातून बाहेर पडले. (transfers sweepers of Municipal Corporation entered General Assembly for demand dhule news)

कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या, या मागणीसाठी बदली सफाई कामगारांनी कामबंद, ठिय्या आंदोलन केले. मागण्यांबाबत मनपा आयुक्त देवीदास टेकाळे यांच्याकडे व्यथा मांडली. महासभेच्या अजेंड्यावर विषय घेऊन ठराव मंजूर करावा व शासनाकडे सादर करावा, अशी मागणी कामगारांनी निवेदनाद्वारे केली.

दरम्यान, महापालिकेच्या महासभेत एन्ट्री केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त विजय सनेर, नगरसेवक शीतल नवले, नगरसेवक हिरामण गवळी यांनी त्यांची समजूत काढली. अनेक वर्षांपासून मागणीकडे दुर्लक्ष होत असून, अनेक ठिकाणी रोजंदारी, फंडातील कर्मचारी, कॉन्ट्रॅक्ट बेसवरील तसेच मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्यात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

transfers sweepers of Municipal Corporation entered General Assembly for demand dhule news
NMC Commissioner Appointment : आयुक्त पदासाठी भाजप-शिंदे गटात रस्सीखेच!

महापालिका प्रशासन १८८ पदे भरण्याची प्रक्रिया करत असून, सफाई कामगारांनाही न्याय देण्याची गरज आहे. मात्र, या प्रक्रियेत सफाई कामगारांवर दुजाभाव केला जात असल्याचे कामगारांनी निवेदनात म्हटले आहे.

गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून कामगार सेवा देत आहेत. १५ जानेवारी २०१३ ला बदली सफाई कामगारांनी बिऱ्हाड आंदोलन, बेमुदत उपोषणही केले होते. या आंदोलनादरम्यान रामदास मोरे या सफाई कामगाराचा मृत्यू झाला.

या वेळी महापालिकेच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तत्काळ महासभा घेतली होती व स्टिफिंग पॅटर्ननुसार सफाई कामगारांना कायम सेवेत समाविष्ट करणे व त्यासाठी पदांची मंजुरी घेण्याबाबत चर्चा करून २१ मार्च २०१३ ला सर्वानुमते ठराव मंजूर करून शासनाला पाठविला होता. मात्र, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. प्रमिलाबाई बन्सी निकम, पिंकीबाई श्यामराव गोयर, राजू शिवा अंकुशे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी हे निवेदन दिले.

transfers sweepers of Municipal Corporation entered General Assembly for demand dhule news
Nandurbar Crime : अवैध गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.