Nandurbar News : विखुर्ले (ता. शिंदखेडा) शिवारात बेकायदेशीरीत्या सोमवारी (ता. २६) दुपारी चारच्या सुमारास मुरूम गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर, एक जेसीबी यंत्र महसूल पथकाने ताब्यात घेतले आहे.
अपर तहसीलदार आशा गांगुर्डे यांनी ११ लाख ६६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. दलवाडे (ता. शिंदखेडा) येथील भटू पाटील यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरला (एमएस १८, एएन ४५०) एक लाख ४० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.(Transport of secondary minerals Punitive action against perpetrators Nandurbar Crime News)
नवे कोडदे (ता. शिंदखेडा) येथील मयूर पाटील यांचे जेसीबी यंत्र (एमएच १९, सीझेड ४२१२) ताब्यात घेतले. त्यास सात लाख ५० हजार रुपये तर एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर यास एक लाख चाळीस हजार रुपये दंडाची नोटीस देण्यात आली.
हिसपूर (ता. शिंदखेडा) येथील भिका पाटील यांचे एक ट्रॅक्टर विना क्रमांकाचे तर दुसरे (एमएच १९, बीआर ३५७६) या दोन्ही ट्रॅक्टरला प्रत्येकी एक लाख ४० हजार याप्रमाणे दंडात्मक कारवाईची नोटीस देण्यात आली आहे.
गौण खनिज पथकातील कर्मचारी खर्दे तलाठी डी. एस. भगत, टाकरखेडा तलाठी एम. ए. गायकवाड, शेवाळे तलाठी एन. एस. माजलकर, मंडळ अधिकारी श्री. भामरे, व्ही. आर. सिंगल, बी. एस. नारवाल, तलाठी विखुर्ले यू. बी. मोरे, मंडळ अधिकारी दोंडाईचा यांनी पंचनामा करून वाहने जप्त केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.