Dhule News : गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनास जीपीएस नसल्यास एक मेपासून वाहतूक पास देण्यात येणार नाही. (transport pass will not be issued from May 1 if vehicle transporting minor minerals does not have GPS dhule news)
खाणपट्टी मंजुरी, खाणपट्टा नूतनीकरण व अल्पमुदत परवाना अर्ज, गौण खनिज विक्रेता परवाना अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच महाखनिज प्रणालीवर स्वीकारण्यात येणार आहेत. ऑफलाइन अर्ज स्वीकारणे बंद होणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.
अर्जाच्या अनुषंगाने आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्यांनी त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाइन करण्यात यावी. जीपीएस डिव्हाईस बसवण्यासाठी दिलेल्या कालावधीनंतर भरारी पथकाकडून कारवाई करण्यात येईल.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
गौण खनिजांचे अवैध उत्खनन व अवैध वाहतूक रोखण्यासाठी गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएसद्वारे रिअल टाइम मॉनिटरिंग केले जाणार आहे. त्यासाठी जीपीएस डिव्हाईस बसवणे व गौण खनिज उत्खनन परवानगीची प्रक्रिया ऑनलाइन करणे आणि ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्याबाबत महसूल व वन विभागाने निर्देश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.