Nandurbar News : जीव धोक्यात घालून प्रवास; अक्कलकुवा तालुक्यात जागोजागी खड्डे

Status of Netrang-Shewali highway after fifteen days of major repairs.
Status of Netrang-Shewali highway after fifteen days of major repairs.esakal
Updated on

Nandurbar News : नेत्रंग-शेवाळी महामार्गाचे रुंदीकरण मंजूर आहे. असे असतानाही काम रखडल्याने अक्कलकुवा तालुक्यातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे थातुरमातुर काम, दिशादर्शक फलक लावले नाहीत, मूळ रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइटपट्ट्या खचल्या आहेत.

परिणामी लाहन-मोठ्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी केलेल्या डागडुजीला पण दुरुस्तीची गरज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.(travel at risk of life due to potholes in akkalkuwa district nandurbar news)

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित विभाग व अधिकाऱ्यांची हलगर्जी, दुर्लक्ष कारणीभूत असल्याने नागरिक, प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. अक्कलकुवा हद्दीतील रस्त्यावर खड्डे वाचविताना वाहने रस्त्याच्या कडेला कोसळल्याची राजमोही येथील ताजी घटना आहे.

याबाबत वारंवार नागरिकांकडून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करण्याची मागणी होत आहे; परंतु याकामी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना आणि संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रशासनाला कसलेच गांभीर्य नसल्याचे पुढे येत आहे.

गुजरातला जोडणारा नेत्रंग-शेवाळी रस्ता महत्त्वाचा मानला जातो. शिवाय या रस्त्यावरील दैनंदिन वाहतूकही प्रचंड आहे. असे असतानाही अद्याप अक्कलकुवा तालुक्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले; परंतु थातुरमातुर डागडुजी केल्यामुळे आठवड्याभरातच रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थे’ झाली.

याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदारांची हलगर्जी दिसून येत आहे. तसेच या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून असे सांगण्यात येते, की हा महामार्ग आमच्या कार्यालयांतर्गत येत नाही. त्यामुळे आम्ही नेत्रंग-शेवाळी महामार्गाच्या संबंधित कोणतेही काम करू शकत नाही.

Status of Netrang-Shewali highway after fifteen days of major repairs.
Nandurbar News : आदिवासी भागात बारमाही उत्पन्नाच्या स्रोताची आस; ठोस पावले उचलण्याची आवश्यकता

तसेच ज्या विभागाकडे या महामार्गाच्या कामाची जबाबदारी आहे ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे कार्यालय नंदुरबार जिल्ह्यातच नाही. त्यामुळे नेमका संपर्क साधावा कुठे, हा प्रश्न स्थानिकांना उपस्थित होतो. परिणामी अक्कलकुवा तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गाकडे पूर्णता दुर्लक्ष होत असून, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे

पावसाळ्यात या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण खूपच वाढते. सायंकाळनंतर वाहनचालक या महामार्गाने प्रवास करायला धजावत नाहीत. यापूर्वी अनेकदा अपघातांची मालिका घडूनही त्यातून बोध घेतला जात नाही. शासन व प्रशासन अजून किती जणांचा बळी जाण्याची वाट बघतेय तेच कळेनासे झाले आहे.

महामार्गालगत गव्हाळी, खापर, अक्कलकुवा, वाण्याविहीर आदी गावे असून, तेथील ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होते. इमर्जन्सी पेशंट असेल तर ते रस्त्यातच दगावण्याची मोठी शक्यता आहे, तर गर्भवती महिलेला या रस्त्यावर प्रवास करणे अशक्य आहे. प्रवाशांसह दुचाकीस्वार व इतर लहान वाहनधारकांनाही त्याचा मोठा त्रास होतो.

रस्ता दुरुस्तीसाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागेल, असा सर्वसामान्यांचा सवाल आहे. संबंधित विभागासह अक्कलकुवा तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे त्वरित लक्ष घालावे व जनसामान्यांच्या जिवाशी चाललेला हा खेळ थांबवावा, अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे.

Status of Netrang-Shewali highway after fifteen days of major repairs.
Nandurbar News : मृत सहकाऱ्याच्या कुटुंबीयांचे पोलिस दलाने पुसले अश्रू; स्वेच्छेने 4 लाख 65 हजार रुपयांची मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.