Dhule News: करवंदला 62 एकरांवर साकारणार वृक्षराजी; शासनाचा हिरवा कंदील

B07398 अमरिशभाई पटेल B07399
Tree plantation
Tree plantation
Updated on

Dhule News : नवनाथांपैकी श्री गोरक्षनाथ यांची तपोभूमी व नाथपंथीयांसाठी महत्त्वाचे स्थान असलेल्या करवंद (ता. शिरपूर) परिसरात ६२ एकर क्षेत्रावर वृक्षराजी फुलविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या महसूल आणि वन विभागाने त्याबाबत त्रिपक्षीय करारनामा करून शासननिर्णय नुकताच जाहीर केला.

आमदार अमरिशभाई पटेल व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्याकडून या कामासाठी पाठपुरावा सुरू होता. येथील वृक्षारोपण व संगोपन हा पटेल बंधूंचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो.

असा झाला करार

श्री गोरक्षनाथांनी तप केलेले स्थान असलेल्या करवंदजवळ वन विभागाच्या अखत्यारीत मोठी जागा आहे. त्यांपैकी सुमारे २५ हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण करून हा परिसर हरित करण्यासाठी आमदार पटेल व भूपेशभाई पटेल यांचा पाठपुरावा सुरू होता. (tree Plantation on 62 acres in shirpur dhule news)

तेथील अवनत वन क्षेत्राचे पुनर्वनीकरण करण्यासाठी खासगी व अशासकीय संस्थांचा सहभाग घेण्याबाबत त्रिपक्षीय करारनामा करून १७ नोव्हेंबरला शासन निर्णय जाहीर करण्यात आला. श्री विलेपार्ले केळवणी मंडळासह मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आगामी सात वर्षांत टप्प्याटप्प्याने येथे वनीकरण करण्यात येणार आहे.

ड्रीम प्रोजेक्टची पूर्तता

वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासह पटेल बंधू १९८५ पासून प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी शिरपूर पालिकेने शहरात विक्रमी वृक्षारोपण करून शहरात रस्ते व नाल्यांचे काठ, नदीचे काठ, कॉलनी परिसरातील ओपन स्पेस, बखळ जागांच्या मालकांच्या सहकार्याने हिरवाई फुलविण्यात आली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रदूषणाचे संभाव्य प्रमाण लक्षात घेऊन त्यांनी वृक्षारोपण मोहिमेचा विस्तार तालुकाभरात करण्याचा संकल्प सोडला.

तालुक्यातील असली व नागेश्वर येथील सातपुड्याच्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. पाठोपाठ करवंद येथेही वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. तब्बल ६२ एकरांवर विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड आणि संगोपन करून तेथे वनीकरण साध्य केले जाणार आहे. पटेल बंधूंच्या या ड्रीम प्रोजेक्टला शासनाने मान्यता दिल्यामुळे करवंद येथे तीर्थक्षेत्रासह निसर्ग पर्यटन खुले करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Tree plantation
Dhule News : यंदा बागायती रब्बीनी आवरती बागायत..! विहिरी कूपनलिकांची पातळी खालावतेय

अशी होतील कामे

करवंद येथील ६२ एकर क्षेत्रात एका हेक्टरवर एक हजार १११ याप्रमाणे एकूण २७ हजार ७७५ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्षारोपण मोहिमेत करवंदच्या अवनत वनक्षेत्रात वृक्षलागवड करणे, जल व मृदसंधारण करणे, सात वर्षांपर्यंत त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे अशी कामे करण्यात येणार आहेत.

हा प्रकल्प आणि त्याचे व्यवस्थापन यांचा संपूर्ण खर्च मुंबई येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ करणार आहे. त्यांना मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य लाभणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, त्याचे सूक्ष्म नियोजन पटेल बंधूंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

"निसर्गाकडून मानवाने जे घेतले, त्याची कितीतरी अधिक पटीने भरपाई करणे आवश्यक आहे. आगामी पिढ्यांना प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागणार असून, त्यांच्यासाठी आम्ही वृक्षांच्या रूपाने गुंतवणूक करीत आहोत. याकामी विविध समाजघटकांसह शासनाचेही मोठे सहकार्य लाभले आहे. आमचा ड्रीम प्रोजेक्ट करवंदला साकारता येण्याचा मार्ग खुला झाल्याचे समाधान आहे." -भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष

Tree plantation
Dhule News : सातपुड्यातील हजारो लोकांना ‘गजनी’ने बनविले शाकाहारी; अंगावरील कपड्यांद्वारे संदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.