Nandurbar News : अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत दिला जाणार असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.(Tribal Development Project Office Will give Pesa resident certificate Information from Assistant Collector Mandar Patki Nandurbar News)
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या २९ ऑगस्ट, २०१९ च्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याची मान्यता मिळाली आहे.
तरी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव कार्यक्षेत्रातील सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र (पेसा) रहिवासी दाखला प्रकल्प कार्यालयात रहिवासी दाखला मिळणार आहे.
हा दाखला मिळण्यासाठी उमेदवारांनी तहसीलदारांचे अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधारकार्ड, स्वयंघोषणापत्र, उमेदवार राहत असलेला पाडा हा पेसा क्षेत्रात येत असल्याबाबतचे महसूल ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा शासकीय दूध डेअरीच्या मागे, शहादा रोड तळोदा, येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.