Tribal Holi Festival 2023 : वाल्हवे येथे होलिकोत्सव उत्साहात; चाळीस वर्षांपासून एक गाव-एक होळी

Tribal Holi Festival 2023 Holikotsav celebrated in Valve For 40 years one village one Holi dhule news
Tribal Holi Festival 2023 Holikotsav celebrated in Valve For 40 years one village one Holi dhule newsesakal
Updated on

म्हसदी (जि. धुळे) : वाल्हवे (ता. साक्री) येथे गेल्या चाळीस वर्षांपासून एक गाव-एक होळी (शिमगा) उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यंदाही पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव (Tribal Holi Festival) साजरा करत आदिवासी संस्कृतीचा उत्सव साजरा झाला. (Tribal Holi Festival 2023 Holikotsav celebrated in Valve For 40 years one village one Holi dhule news)

चाळीस फुटांची उंच सावर

कार्तिकी पौर्णिमेपासून होळी सणाची आदिवासी बांधव प्रतीक्षा करतात किंबहुना होळी सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत आनंदोत्सव साजरा केला जातो. होळीच्या तीन दिवस अगोदर आदिवासी (भिल्ल) बांधव होळीच्या (दांडा) शोधार्थ बाहेर निघतात.

वीस-बावीस किलोमीटर अंतर फिरून सुमारे पस्तीस ते चाळीस फूट उंचीचा होळीचा दांडा (सावर) शोधला जातो. तो अलगद उचलून पंचवीस ते तीस युवक खांद्यावर घेऊन येतात. विशेष म्हणजे तो खाली न ठेवता जमिनीत गाडला जातो.

दांडा आणल्यावर तिला ढेंगी (चार लाकडांची कैची) लावली जाते. शेंड्यावर राज होळीचा पडदा बांधला जातो. लाकडाच्या पडद्याला प्रत्येक घराचा साखरेचा हार बांधला जातो. होळीचा शेंडा पूर्ण पांढराशुभ्र दिसतो. वरती एक पांढऱ्या कपड्याचा छोटा झेंडा बांधला जातो.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Tribal Holi Festival 2023 Holikotsav celebrated in Valve For 40 years one village one Holi dhule news
Nashik News: बदली प्रक्रियेविरोधात शिक्षकांचा एल्गार! ZPत ठिय्या; न्यायालयात जाण्याचा एकमुखी निर्णय

होळीच्या दांड्याला ठराविक अंतरावर मजबूत दोरखंडाने, आजूबाजूला एका दोराच्या टोकाला सहा ते सात माणसे असे लहान-मोठे चाळीस ते पंचेचाळीस जण पाच फूट खड्ड्यात सावकाश पद्धतीत होळीचा दांडा उभा करतात. गावातील प्रत्येक व्यक्ती सहभाग घेत होळीत सुकलेले लाकूड टाकून सजवितात.

बोन (नैवेद्य) दाखवून होळीपूजन

‘जागल्या (होळकर) बोना, लई, या र... लवकर या..र.’ अशा आरोळ्या मारत गर्दी केली जाते. यंदा आदिवासी संस्कृतीचा आदर्श ठेवत एक गाव-एक होळी उत्सव साजरा झाला. आबालवृद्धांनी होळीचे पूजन केले.

पोलिसपाटील धीरज पवार यांच्या हस्ते होळीपूजन झाले. सरपंच रामचंद्र कडवे, चंद्रशेखर गायकवाड‌, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी प्रत्येकी पाच फेऱ्या मारल्या. डोलच्या वाद्यावर आदिवासी बांधवांनी होळीच्या प्रकाशात रात्री उशिरापर्यंत नृत्य केले. अखेरच्या क्षणी होळी पडते.

Tribal Holi Festival 2023 Holikotsav celebrated in Valve For 40 years one village one Holi dhule news
Dhule News : अडीचशे वाहनधारकांचे लायसेन्स निलंबित; मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने कारवाई

होळीच्या दांड्याला बांधलेला वरच्या पडद्यावरचे हार, नारळ यांच्यावर होळकर कब्जा करतात. दुसरीकडे लहान मुले होळीला बांधलेल्या हार, कंगणावर डोळा (लक्ष) ठेवतात. विशेष म्हणजे जळालेल्या होळीच्या काजळाचा टीका सर्व ग्रामस्थ लावतात. यातून ईडापीडा टळते अशी आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे.

अधिकाराने फाग मागला जातो

होळी (शिमगा) सण साजरा झाल्यावर पाच दिवसांनंतर आदिवासी बांधव फाग मागत धुळवड खेळतात. लहान मुले बैलांचे घुंगरू कंबरेला बांधून घरोघरी फाग मागतात. ग्रामस्थ व वाहनधारक आदिवासी बांधवांना ऐच्छिक रोख रक्कम देऊन शुभेच्छा देतात.

"आदिवासी बांधवांचा होळी हा सर्वांत मोठा सण मानला जातो. आदिवासी बांधवांच्या अनेक परंपरा अजूनही कायम आहेत. भावी पिढीने अशा परंपरा जपणे काळाची गरज आहे."-पंडित सुका पवार, ग्रामस्थ, वाल्हवे (ता. साक्री)

Tribal Holi Festival 2023 Holikotsav celebrated in Valve For 40 years one village one Holi dhule news
Budget 2023 : सानुग्रह अनुदानाच्या मागणीस यश; गिरीश नेरकर यांनी केली होती मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.