Dhule News : शिंदखेडा येथे आदिवासी मोर्चाला गालबोट; आरोपींना अटकेसाठी आंदोलक रस्त्यावर

विरदेल (ता. शिंदखेडा) येथील पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करून तिला गोणपाटात भरून विरदेल गावशिवरातील दादरच्या शेतात फेकून देण्यात आले होते.
A march organized by the tribal community on Wednesday.
A march organized by the tribal community on Wednesday.esakal
Updated on

Dhule News : विरदेल (ता. शिंदखेडा) येथील पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करून तिला गोणपाटात भरून विरदेल गावशिवरातील दादरच्या शेतात फेकून देण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करून फास्टट्रॅक न्यायालयात केस चालवून आदिवासी समाजाला न्याय द्यावा, या मागणीसाठी आदिवासी टायगर सेना व इतर आदिवासी संघटनांनी बुधवारी (ता. १४) दुपारी बाराला मोर्चा काढण्यात आला.

मोर्चा शिंदखेडा पोलिस ठाण्याजवळ आला असता परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करण्यात आली. त्यात बसमधील दोन महाविद्यालयीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी वेळीच दक्षता घेतल्याने पुढील अनर्थ टळला. (tribal march was held to demand that accused should be immediately arrested for murder of minor girl dhule news)

विरदेल येथील आदिवासी अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी न्याय मिळावा यासाठी आदिवासी समुदायातर्फे मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा ः विरदेल येथील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीचा खून करून मृतदेह शेतात फेकण्यात आल होता.

त्या संदर्भात लवकरात फास्टट्रॅक न्यायालयातून न्याय मिळावा व आरोपीस त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. बालिकेला न्याय मिळावा व आरोपीस अटक करून शासनाने आदिवासी समाजाला न्याय द्यावा. या घटनेमुळे संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात संतापाची लाट असून, शासनाने पूर्ण पोलिस यंत्रणा आपल्या परीने कसून चौकशी करत आरोपीस अटक करावी.

शिंदखेडा येथे मोर्चा प्रथम तहसील कार्यालयात नेण्यात आला, नंतर दुपारी १२ ते एकदरम्यान मोर्चा शिंदखेडा पोलिस ठाण्यावर नेण्यात आला. पोलिस ठाण्यात शिरपूर उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह सर्व पोलिस उपस्थित होते.

मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत पदाधिकाऱ्याचे भाषण झाले. त्या वेळी वरपाडे रत्यावर पोलिस ठाण्या समोर मोर्चातील महिला व पुरुष युवक बसले असताना दोन्ही बाजूस दोन एसटी बस उभ्या होत्या.

A march organized by the tribal community on Wednesday.
Dhule News : जिल्ह्यात पर्यवेक्षकांची अदलाबदली; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय बदलण्यासाठी गळ

नेत्यांची भाषणे झाल्यावर मोर्चाची संगता झाल्यानंतर निवेदन देण्यासाठी पोलिस ठाण्यात पदाधिकारी जात असताना वरपाडे रस्त्यावरील बस शिंदखेडा बसस्थानकाकडे जात असताना व शिंदखेडा बसस्थानकाकडून अक्कडसे, सोनेवाडी, नेवाडे बस मार्गस्थ होत असताना अचानक मोर्चातील कोणीतरी बसच्या पुढील वाहकाच्या कडेला असलेल्या काचा फोडल्या व आजूबाजूने सर्व बसवर तुटून पडले.

त्यात बसच्या मागील दोन्ही काचांवर कोणीतरी दगड मारल्याने काच फोडून दगड आत गेले. त्यात बसमधील दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. मोर्चातील काहींनी व पोलिसांनी आवर घालत उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी ध्वनिक्षेपकावरून आव्हान केले, त्यानंतर मोर्चेकरी तेथून गेले.

विद्यार्थी जखमी

शिंदखेडा आगाराची अक्कडसे, सोनेवाडी, नेवाडे एसटी बस (एमएच १४, बीटी ०४४६) या बसच्या मागील व पुढील काचा फोडून नुकसान करण्यात आले. त्यात जनता हायस्कूलमध्ये दहावीत शिक्षण घेणारा गणेश द्यानेश्वर साळुंखे याच्या ओठाला दगड लागल्याने किरकोळ जखमी, तर बारावीत शिक्षण घेणारा मयूर जिजाबराव पाटील याला डाव्या कानाच्या वरील डोक्याला दगड लागून जखमी झाला.

बसचालक भरतसिंग पिरतसिंग पवार हेही किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी जखमींना शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून सोडून देण्यात आले. शिंदखेडा पोलिस ठाण्यात एसटी बसचालक भगतसिंग पिरतसिंग पवार यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात तीन ते चार जणांवर बसची तोडफोड केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार एखलाक पठाण तपास करीत आहेत.

A march organized by the tribal community on Wednesday.
Dhule News : शिंदखेडा येथील भाजी मंडईचा तिढा कायम; बैठकीत ठोस निर्णय नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.