Dhule TB Patient : शहरात दीड हजारावर क्षयरुग्ण; रुग्णांना शासनाकडून तुटपुंजी मदत

शहरात संशयित क्षयरुग्णांच्या तपासणी प्रक्रियेत दीड हजारावर क्षयरुग्ण आढळून आले.
TB
TBSakal
Updated on

Dhule TB Patient : शहरात संशयित क्षयरुग्णांच्या तपासणी प्रक्रियेत दीड हजारावर क्षयरुग्ण आढळून आले. या रुग्णांवर सध्या औषधोपचार सुरू असून, दानशूरांच्या मदतीने या रुग्णांना पोषण आहार किटही वाटप करण्यात आले.

दरम्यान, क्षयरुग्णांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत तुटपुंजी असल्याने रुग्णांना पोषण आहार उपलब्धतेसाठी दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले. (Tuberculosis patients over 1500 in city Dhule news)

शहर क्षयरोग विभागातर्फे क्षयरुग्णांच्या तपासणीसाठी अत्याधुनिक सीबीनेट मशिन धुळे महापालिकेच्या राऊळवाडी दवाखाना येथे उपलब्ध आहे.

तसेच ट्रनेट हे अत्याधुनिक मशिन महापालिकेच्या नंदीरोड दवाखाना व शहर क्षयरोग दुरीकरण केंद्र येथे उपलब्ध आहे. धुळे शहर‍ टीबीमुक्त करण्यासाठी योग्य निदान तसेच योग्य उपचार महत्त्वाचे असल्याचे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जे. सी. पाटील यांनी म्हटले आहे.

दीड हजारावर रुग्ण

धुळे शहरात या वर्षी ११ हजार ३०७ संशयित नागरिकांची क्षयरोगाबाबत तपासणी करण्यात आली. यात एक हजार ५२७ नागरिकांमध्ये क्षयरोग आढळला. या रुग्णांना औषधोपचार सुरू करण्यात आला आहे.

या रुग्णांना काही दानशूरांकडुन एक हजार ७११ पोषण किट वाटप करण्यात आले. क्षयरुग्णांना शासनाकडून मोफत औषध तसेच प्रत्येक रुग्णाला पहिल्या सहा महिन्यांकरिता दरमहा पाचशे रुपये दिले जात आहेत.

TB
TB Patient: लॉकडाऊनकाळात ४३ हजार नवे क्षयरोग रुग्ण

मात्र, असे असले तरी रुग्ण बरे होण्यासाठी या रुग्णांना पोषण आहारही मिळणे गरजेचा आहे. दरम्यान, धुळे शहरात सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के असल्याचे शहर क्षयरोग विभागाने म्हटले आहे.

दानशूरांनी मदत करावी

समाजातील क्षयरुग्णांना लवकर बरे होण्यासाठी पोषण आहार मिळणे गरजेचा असतो. शासनाकडून दरमहा मिळणारी मदत तुटपुंजी असल्याने सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी योगदान देणे गरजेचे आहे.

अशा संस्था किंवा नागरिकांना शासनातर्फे गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येते. पोषण आहाराच्या किटमध्ये गहू, डाळ, तेल, शेंगदाणे, गूळ, खोबरे, कडधान्य या वस्तूंचा समावेश असतो.

यामुळे रुग्‍णामध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास मदत होते. अशो पोषण आहार उपलब्धतेसाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

TB
Sambhaji nagar : TB हरेल, देश जिंकेल!

‘एचआयव्ही’नंतर सर्वाधिक घातक

जगात एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश नागरिक क्षयरोगाच्या विळख्यात आहेत. या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचा विचार केल्यास एचआयव्हीनंतर हे सर्वांत घातक इन्फेक्शन आहे. मात्र, नियमित औषधोपचाराने या रोगावर नियंत्रण मिळविता येते.

केंद्र सरकारने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. नियमित औषधी घेतली तर क्षयरोग पूर्णपणे बरा होतो.

TB
TB Free India Mission : ‘निक्षय मित्रां’कडून धुळ्यात 463 क्षयरुग्ण दत्तक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()